अंधश्रद्धा निर्मूलन समिती जत च्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन


जत:प्रतिनिधी/PSK NEWS NETWORK
20 ऑगस्ट या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो या घटनेला आठ वर्ष होऊन गेली तरीही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी सापडत नाहीत अंधश्रद्धा निर्मूलन समिति च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. नरेंद्र दाभोळकर यांना जत येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभा जवळ महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमर रहे शहीद दिनाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या नरेंद्र दाभोळकरांचे कार्य अतुलनीय होते . त्यांनी समाजातील कर्मकांड अंधश्रद्धा वाईट रूढी परंपरा प्रथा यावर प्रखर टीका करून समाजाला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.असे मत सुनील सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन. या कार्यक्रमाला उपस्थित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक इब्राहीम नदाफ महिला आघाडीच्या प्रमुख डॉ.श्रद्धा सनमडीकर सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव दत्तात्रेय शिंदे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष पदम उमराणी,हाजी एजाज हुजरे ,रियाज जमादार, फयाज जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
Mo. 90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule