काष्ट्राईब महासंघ वाहन चालक शाखेचे उद्घाटन अमजदखान मिरजकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

 

जत:प्रतिनिधी/PSK NEWS NETWORK
सांगली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कास्ट्राईब शासकीय संलग्न व निमशासकीय वाहन चालक संघटना शाखेच्या उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.अमजदखान मिरजकर यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, प्रमुख उपस्थिती महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी, मार्गदर्शक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जे.के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, चतुर्थ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय व्हनमाने, सॅलरी सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअरमन राजेंद्र कांबळे, बावधनकर, पाटबंधारे पतसंस्था चेअरमन प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. 

यावेळी नुतून कार्यकारणी जाहीर करण्यात आले.निवड झालेले कार्यकरणी याप्रमाणे आहे. जिल्हाध्यक्ष अमजदखान मिरजकर तर वरीष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत वरुडे, कार्याध्यक्ष प्रदीप कोळी, भारत आलासकर, कोषाध्यक्ष एस. एम. जावीर, उपाध्यक्ष म्हणून वैभव कोळी, बापू कोळी, ए.डी. सावंत, अतिरिक्त सरचिटणीस प्रकाश कोळी, खुशबू दिन पिंपरे, संभाजी जानकर, मुख्य संघटक ज्ञानेश्वर माळे, संघटक सचिव पोपट यादव, विकास पवार, व्ही. सावंत, पंकज कांबळे, कार्यकारणी सदस्य अमित चव्हाण, सचिन कांबळे, संजय माळी, संदीप चौगुले,सचिन वासुदेव, प्रसिद्धीप्रमुख बन्सीलाल मांडवे, वाहन चालक यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

या कार्यक्रमासाठी पुणे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब व्हनखंडे, जिल्हा सचिव बाबासाहेब माने, उपाध्यक्ष प्रशांत कोळी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बनसोडे, सचिव रमेश सोनावणे, अनिल धनवडे, विनोद पवार, रविन ठोंबरे, बाळू हजारे, तलाठी, मंडल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील जावीर, पाटबंधारे विभाग अध्यक्ष कुमार कांबळे, कृष्णा मासाळ लालासाहेब मोरे, झाकीर हुसेन चोगुळे, सॅलरी सोसायटी थे माजीबचेअरमन अभिमन्यू मासाळ, राजाराम चोपडे, गणेश धुमाळ, उपस्थित होते.यावेळी ४२ विभागाचे वाहन चालक कास्ट्राईब शासकीय व निमशासकीय वाहन चालक संघटनेत सामील झाल्या बद्दल अमजदखान मिरजकर यांचे हस्ते सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व मोठ्या संख्येने वाहन चालक सहभागी झाले होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule