महाराष्ट्र कलाकार सेनेच्या अध्यक्षपदी दिनकर पतंगे यांची निवड कारमपुरी महाराज


       
जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र कलाकार सेना पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्षम्हणून दिनकर पतंगे यांची निवड करण्यात आल्याचे  कारमपुरी महाराज प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र कामगार सेना यांनी घोषित केले.दिनकर पतंगे यांचे महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या पदाचे काम चांगले उत्कृष्ट पद्धतीने चालू असल्याचे सांगितले. आणि हे त्यांचे काम दिसून पण आलेले आहे. त्यामुळे मी त्यांचे वरती महाराष्ट्र कलाकार सेना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवत आहे मला खात्री आहे ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करू शकतील. महाराष्ट्र कामगार सेनेने त्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य व ताकद दिलेली आहे. याचा वापर करून *ते कलाकार सेना तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष या पदाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू शकतील यात शंका नाही, असे प्रतिपादन कारमपुरी महाराज सोलापूर यांनी आपल्या कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिनकर पतंगे यांना देत असताना त्यांनी केले.या नवीन क्षेत्रात त्यांना काम करण्याची  खूपच चांगली संधी आहे आणि त्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने करून दाखवावे असे कारमपुरी महाराज यांनी केले यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे  व कलाकार सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
  या निवडीने दिनकर पतंगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक