जिल्हा परिषद शाळा खैराव येथे वरिष्ठ मुख्याध्यापकपदी जगन्नाथ वायदंडे

 
जत:प्रतिनिधी
जत तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष व काराजनगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जग,न्नाथ वायदंडे (बापू)हे जि प शाळा खैराव येथे वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून हजर
 झाले.
त्या निमित्ताने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यातआला.
तसेच जि प शाळा खैरावचे माजी विद्यार्थी विष्णू टोणे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ वायदंडे सर म्हणाले,शाळेचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन.पीएसआय टोणे म्हणाले,शाळेसाठी लागणाऱ्या मदतीसाठी केव्हाही हाक मारा आम्ही मदत करण्यास तयार आहोत.
यावेळी सरपंच राजाराम घुटुकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी करांडे,  केंद्रप्रमुख संजय काशीद, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर,उपाध्यक्ष मनोहर येऊल,भालचंद्र गडदे,  दत्तात्रय साळे,संजय  साळे, प. सदस्य बिराप्पा करांडे व गणेश जिपटे  उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार मनोहर येऊल यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule