केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मोर्चे काढाच पण माळशिरस तालुक्यात घडलेल्या जातीयवादी घटनेला ही न्याय द्या. - सचिन झेंडे (बसपा माडग्याळ सेक्टर अध्यक्ष)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मा.मुख्यमंत्री यांच्या वर केलेल्या बेताल वक्तव्यावर पुर्ण महाराष्ट्र भरातुन निषेध व्यक्त केला जात आहे. आणि ते योग्य ही आहे. पण या ठिकाणी आणखी एक नींदनिय , माणुसकी ला लाजवणारी , जातीभेदाच समर्थन करणारी अतिशय वाईट घटना या पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. पण याकडे सोईस्करपणे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात माळेवाडी या गावच्या सरपंच जो गावचा प्रथम नागरिक म्हणून पाहतो, त्या सरपंचाच्या भावाचा अंतिम विधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास तेथील जातीयवादी, विखारी मनुवादी विचारसरणीचे लोक मज्जाव करतात, अडवतात कारण तो मातंग समाजातील आहे,  व शेवटी प्रशासनाचे डोळे उघडावेत हा एकमेव उद्देश ठेवून त्या मयताचा अंत्यविधी माळेवाडी ग्रामपंचायतीच्या दारात केला जातो,या घटनेने पुर्ण महाराष्ट्र भरातुन निषेध व्यक्त होत असताना , महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रहखातं आपल्या डोळ्यासमोर कोणती काळी पट्टी बांधून घेतले आहे..हा प्रश्न महाराष्ट्रातील या तमाम आजही दलित म्हणून वावरणाऱ्या बांधवांना पडला आहे.
नारायण राणे यांच्या विरोधात मोर्चे  करणाऱ्या तमाम जनता व टीआरपी वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या मिडिया आणि शिवसैनिकांना एक महाराष्ट्रीयन म्हणुन आवाहन आहे , आपण त्या पिडीत कुठंबाच्या समर्थनार्थ मोर्चे काढाल काय ? त्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढाल काय? या आजही चालू असलेल्या विषारी जातीयवादी मानसिकता असलेली परिस्थिती बदलण्यासाठी काम कराल काय? ...
 
सचिन झेंडे
बहुजन समाज पार्टी
सेक्टर अध्यक्ष माडग्याळ (ता.जत)

सविस्तर बातमी पहा...
https://youtu.be/LWef6oMjTLc

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule