एकुंडी येथे कोविड लसीकरण मोहीम
जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जिरग्याळ व ग्रामपंचायत एकुंडी यांच्या सहकार्याने जत तालुक्यातील एकुंडी येथे शनिवारी (दि.३१) रोजी नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला. गत अनेक दिवसांपासून आरोग्य विभाग नागरिकांना प्रबोधन, समुपदेशन करीत होते. तरीही नागरिक कोरोना लसीकरण घेण्यास पुढे येत नव्हते. ऐकीव अफवा, गैरसमज, चुकीच्या माहितीमुळे नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. अखेर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीबाबत समस्या -अडचणी समजून त्याप्रमाणे समुपदेशन केले असता लाभार्थी लस घेण्यास तयार झाले. यावेळी गावातील १८ वर्षांवरील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.यावेळी एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील,जिरग्याळ उपकेंद्राचे सि.एच.ओ श्री पी.डी.मोरे, आरोग्य सेवक बी.एस.माने, आरोग्य सेविका ए.ए.वाघमोडे, आशा वर्कर एस.आर.माने, एच.एम.ऐवळे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा