जखमी हंस : सिद्धार्थ आणि देवदत्त यांच्यातील वाद (बुद्ध कथा

)
----------------------------------------------------------
अनेक वर्षांपासून या कथेबद्दल आपण ऐकत आलो. बुद्धपदी पोहोचण्यापूर्वीच सिद्धार्थला सजीवांबद्दल असलेली करूणा या कथेतुन स्पष्ट होते. नेमका हा प्रसंग काय होता हे या गोष्टीतुन जाणून घ्या.

सिध्दार्थ एकदा आपल्या पित्याच्या शेतावर गेला होता. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसुन तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता.    

इतक्यात आकाशातुन एक पक्षी त्याच्यासमोर पडतो, त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता.  

सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला, त्याने त्याच्या अंगातील बाण उपटुन काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. 

त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुडांळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. 

सिद्धार्थला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे.  थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुघांनिशी तेथे आला.

त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असुन काही अंतरावर उडुन गेल्यावर तो इथेच कुठे तरी पडला असावा.  

तो तु पाहिला काय? असे त्याने सिद्धार्ताला विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतुन बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला.  

देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तु माझ्या स्वादिन कर. पण त्याने ते नाकारले. त्यामूळे त्या दोघांमधे तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणने होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच शिकारीचा मालक होतो. 

सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच मालकिचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसर्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो?

या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला.

त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रु बनला. परंतु सिद्धार्थाची करुणावृती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्ष्याचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. 

सिध्दार्थाने देवदत्ताला दाखवून दिले की, मारणारापेक्षा तारणारा सर्वात श्रेष्ठ असतो...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule