कुंभारी येथे सवोॅदय व्यापारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन
जत:/ PSK NEWS NETWORK
कुंभारी ता.जत येथे सवोॅदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ह भ प तुकाराम बाबा महाराज,शंकर नाना जाधव,युवा नेते नाथा पाटील,डॉ. मनोहर मोदी,ॲङ.प्रभाकर जाधव,माजी जि प सदस्य प्रकाश भोसले, माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच राजाराम जावीर, उपसरपंच प्रदीप जाधव,माजी सरपंच धोंडीराम कोल्हापुरे,माणिक वाघमोडे,आप्पासाहेब मसाळ,राम खांडेकर,मधुकर भोसले,मधुकर सूर्यवंशी,बाळासाहेब जाधव,सुनील शिंदे,हिम्मत देवकते,अशोक जाधव,पंडा कोळी,कमलाबाई पाटील,श्रीमती संगीता अरबळी,संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोकराव पाटील ,चेअरमन मनोहर पवार,शिवाप्पा बुद्धीहाळ,अंकुश काशीद,बसाप्पा बेङगे, अण्णाप्पा माळी,रामचंद्र मदने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मनोहर मोदी म्हणाले,सर्वोदय व्यापारी पतसंस्थेने जत, मुचंडी,कुंभारी येथे शाखा सुरू करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे.तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये शाखा काढून सभासदांची चांगली सेवा करावी असे आवाहन केले. तुकाराम बाबा महाराज म्हणाले, सर्वोदय पतसंस्थेने जत तालुक्यात नेत्रदीपक प्रगती केली असून या संस्थेच्या माध्यमातून ग्राहक सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.संस्थेचे चेअरमन मनोहर पवार म्हणाले, सर्वोदय पतसंस्थेच्या तीन शाखेच्या माध्यमातून आरटीजीएस .एनईएफटी व मोबाईल ॲप सुविधा सुरू केल्या असून सर्वसामान्य ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तालुक्यातील येळवी,संख,कुंभारी येथी नवीन तीन शाखा सुरू करणार आहोत. यापुढे अनेक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले प्रास्ताविक व आभार अशोकराव पाटील यांनी मानले.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा