सांगली जिल्ह्यात कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता: दुकाने, मॉल, उपारगृहे, जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून स्पा " या वेळे" पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी : "हे" राहणार बंद
सांगली : राज्य शासनाकडील दिनांक 11 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्ह्यातील विविध घटकांना शिथिलता देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून ज्या विविध घटकांना देण्यात आलेली शिथिलतादेण्यात आली आहे. यामध्ये खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 % क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देणेत येत आहे. उपहारगृह / बार मध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह, बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 09.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील. सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा 50% क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. इनडोअर स्पोर्टस असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. सर्व मैदाने, उद्याने स्था निक प्राधिकरणाने विहीत केल्यासनुसार त्यांयच्यात नियमित वेळेत सुरू राहतील.
विवाह सोहळे खुल्या प्रांगणातील किंवा बंदिस्तर मंगल कार्यालयातील मधील आसन व्ययवस्थे च्यात 50 % क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्यात प्रयोजनार्थ सुरू ठेवण्यानची मुभा देण्याबत येत आली आहे. यामध्ये जास्तीलत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.जिल्हातील सिनेमागृहे व मल्टिप्लेक्सा नाट्यगृह, मल्टिप्ले क्सन (स्वततंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. असेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करणेत येत आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा