युवा नेते संतोष साबळे यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

जत:प्रतिनिधी
जत शहरातील जनतेच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असणारे संतोष (भैय्या)साबळे यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये सांगली जिल्हा प्रभारी अतुल (दादा)कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुमधडाक्यात इन्ट्री. 
कोरोना महामारीच्या कठीण काळात जत शहरातील गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जात भक्कम अशी मदत केली आहे.गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जत शहरात ओळख आहे.तसेच त्यांनी जनतेच्या मनात त्यांची एक वेगळीच आपुलकी आणि छाप निर्माण केली आहे.बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून व अतुल (दादा) कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पुढे मोठ्या ताकतीने जत शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतील.त्यांनी बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश केल्याने जत शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule