छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'
पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके (Prof. Hari Narke)... यांनी
शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली म. जोतिराव फुलेंनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत.
सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.
तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे महात्मा जोतिराव फुले हेच आहेत
पन या सर्व गोष्टी ब्राम्हनांनी आपल्याला सांगीतल्याच नाही
तर म लक्षात ठेवा या वर्षी पासून शिवजयंती ला टिळकांचा फ़ोटो च्या जागेवर महात्मा जोतीराव फूलेंचा फोटो असला पाहिजे
आणि तसेच राजश्री शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असायला हवे
चला आपन सर्व मिळून या ब्राम्हणी रूढ़ि ,परंपरा मोडून काडु ,बंद करु
आणि छत्रपती ,फूले ,शाहू ,या महापुरुषांचे विचार आपल्या समाजाला समजवून , पटवून सांगू
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय क्रांती जय भीम*
*सत्यशोधक समाज*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा