जतला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करासंघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी घेतली आ. विक्रमसिंह सावंत यांची भेट



फोटो जत- आ. विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देताना संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर

जत/प्रतिनिधी:- जत तालुक्याला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी केली आहे.
संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी आ. विक्रमसिंह सावंत यांची जत येथे भेट घेवून निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग उपस्थित होते.
जत तालुका हा विस्ताराने मोठा तालुका आहे. तालुक्यात प्राथमिक शाळेची संख्या जास्त आहे. तालुक्याचा विस्तार पाहता जत पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे तेव्हा जतला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नियुक्त करावा. सध्या गटशिक्षणाधिकारी असलेले दिनकर खरात यांच्याकडे गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. 
तालुक्याला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करावी, केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भराव्यात जत शहरामध्ये शिक्षक भवनला जागा उपलब्ध करून द्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीमध्ये शिक्षकांचा समावेश करावा या मागण्यांचे निवेदन भारत क्षीरसागर यांनी आ. विक्रमसिंह सावंत यांना दिले.
संपादक 
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule