राजे रामराव महाविद्यालय, जतची कु. प्रतीक्षा पाटील हिची जपान विद्यापीठात पीएच.डी. साठी निवड
जत: राजे रामराव महाविद्यालय, जतची कु. प्रतीक्षा बाबगोंडा पाटील हिची जपान विद्यापीठात पीएच.डी. साठी निवड झाली आहे. कु. प्रतीक्षा बाबगोंडा पाटील हिने राजे रामराव महाविद्यालयात एम. एस्सी. पदार्थविज्ञान हि पदवी २०२० मध्ये प्रथम क्रमांकाने संपादन केली. तिची नुकतीच टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चर अँड टेकनॉलॉजी, टोकियो, जपान येथे पीएच.डी. साठी निवड झाली आहे. डॉ. संजय लठ्ठे यांचे जपान मधील सहकारी प्रोफ. काझूया नकाता यांच्या मार्गदर्शनाखाली ती पीएच.डी. चे संशोधन पूर्ण करेल. कु. प्रतीक्षा पाटील हिने याआधीही डिसेंबर २०१९ मध्ये साकुरा एक्सचेंज प्रोग्रॅम मार्फत डॉ. संजय लठ्ठे यांच्याबरोबर जपान मधील विद्यापीठाला २ आठवड्यांसाठी भेट दिली आहे. राजे रामराव महाविद्यालय, जत मध्ये उच्चशिक्षण घेतलेली व पीएच. डी. साठी जपानला जाणारी ती या कॉलेज ची पहिली विद्यार्थिनी आहे. तिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील, पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए. के. भोसले, डॉ. संजय लठ्ठे, प्रा. राजाराम सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तिच्या या यशाबद्धल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा