आज पुन्हा ती दिसली
*आज पुन्हा ती दिसली.* ..
बघताच समोर तिला माझे मलाच मी हरवून गेलो...
बावरलो,गोंधळलो विसरून गेलो मी स्वतःला...
पुन्हा एकदा बुडालो त्याच तिच्या बोलक्या डोळ्यात ....
कधी काळी दिवाना होतो ज्या नजरेचा...
ज्या नजरेनेच व्हायचो घायाळ, तीच नजर आज पुन्हा पडली नजरेस ..
आणि झालो घायाळ पुन्हा एकदा...
तिच्या नजरेचा बाण निघाला तो थेट घुसला हृदयात ...
आणि पाडलं भोक आरपारं ...
आली जोराची सणक वाटलं रक्तबंबाळ झालो, आणि मनाशीच म्हणालो सगळं संपलं आता....
पण आलो लगेच भानावर , आठवला तो नियतीन खेळलेला खेळ...
पाहुन तिच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्राकडे..
विचारता झालो सहज पाहुन त्याच डोळ्यात, कधी काळी होतो मी ज्याचा दिवाना...
काय ओळखलंत का मॅडम ...
पाहुन ती हसली उत्तरादाखल...
अन् उगाचच मी विचार करत बसलो...
ती हसली...मला प्रतिसाद म्हणून ..
का?
उगाचच हसली माझ्या परिस्थितीवर...
हल्लकल्लोळ माजला माझ्या मनात....
खरंच होतो का मी तिच्याही हृदयात...
आज पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या...
ती दिसताच माझ्या नजरेसमोर...
आणि पुन्हा एकदा घायाळ झालो त्याच नजरेने... कधी काळी होतो मी ज्याचा दिवाना...
❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सचिन झेंडे
व्हसपेट ता.जत (सांगली)
वार सोमवार, दि.३०.०८.२०२१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा