एकुंडी ते अनंतपूर रस्ता डांबरीकरणासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी! सरपंच बसवराज पाटील यांनी दिले निवेदन.



जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK
सांगली जिल्हा पालकमंत्री जयंत पाटील यांचे ओ.एस.डी.अमोल डफळे यांना एकुंडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बसवराज पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी उमराणीचे नेते आप्पासाहेब नामद, राहुलसिंह डफळे सरकार, पत्रकार राजु ऐवळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

एकुंडीहुन कर्नाटकातील अनंतपूरकडे जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावरील खडी पूर्ण उखडून गेल्याने हा रस्ता वाहतूकीस बंद झाला होता. सदर रस्त्यावर सरपंच बसवराज पाटील यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून तात्पुरती दुरूस्ती केला. सदरच्या रस्त्यावरून खिळेगाव येथील प्रसिध्द देवस्थान बसवेश्वरला जाणाऱ्या भक्तांची ये-जा असल्याने एकुंडी, वज्रवाड, बिळूर, जिरग्याळ, मिरवाड या गावांतील नागरिक याचं रस्त्याने खिळेगावकडे जात असल्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे.
जत जांबोटी या महामार्गाला जोडणारा हा या भागातील मुख्य ग्रामीण मार्ग आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 1.20 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी एकुंडी ग्रामपंचायतचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्र्यांचे ओ.एस.डी अमोल डफळे यांना लवकर निधी उपलब्ध करावा,
रस्त्याचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी लोकनियुक्त सरपंच बसवराज पाटील यांनी निवेदन दिले, तसेच  डफळे यांनी सुद्धा लवकरात लवकर मंत्री महोदयांशी या रस्त्यांबाबत चर्चा करून निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule