बाळकृष्ण गॅस सर्व्हिसेस जत कडून ग्राहकांची लूट, घेतलेले जादा पैसे ताबडतोब परत करा ः श्रीकांत हुवाळे सर


जत /PSK NEWS NETWORK
 जत शहर आणि तालुक्याताल ग्र्रामीण भागातील लोकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी अधिकृत बाळकृष्ण गॅस सर्व्हिसेस या डीलरची नेमणूक केलेली आहे. परंतु ग्रामिण भागात गॅस सिलेंडर पुरवठा करणार्या वाहनधारकांकडून जादा पैसे घेऊन गॅस सिलेंडर दिल्याचे निदर्शनास आल्याने ज्यांचे जादा पैसे घेतलेले आहेत त्यांना तत्काळ परत करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे यांनी दिला आहे. 
 याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 16 ऑगस्ट पूर्वी ज्या ज्या गॅस ग्राहकांनी गॅस बुकींग केलेला आहे. त्यांना पावती प्रमाणे 842.50 रुपयेे घेणे आवश्यक होते. परंतु 16 ऑगस्टच्या मध्यरात्री पासून गॅस सिलेंडरची किमंत 867.50 रुपयांने वाढल्याने जत तालुक्याच्या ग्रामिण भागात सिलेंडर पुरवठा करणार्या वाहनधारकांनी आज मध्यरात्री पासून गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत असे सांगून प्रत्येक ग्राहकांकडून 870/- ते 880/- रुपये घेतले आहेत. 
 म्हणजेच प्रत्येक गॅस ग्राहकांकडून सिलेंडर टाकीमागे जादा 30 ते 40 रुपये घेतलेले आहेत. ज्या गॅस धारकांनी 842.50 रु.ची पावती काढलेली आहे किंवा त्याचा मोबाईलवर मॅसेज आलेला आहे. त्यांच्याकडून जादा 30 ते 40 रुपये घेतलेले पैसे ताबडतोब परत करावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करु असा इशारा आर.पी.आय.चे तालका अध्यक्ष श्रीकांत हुवाळे सर यांनी दिला आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक