महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जतची मासिक बैठक संपन्न

 

जत प्रतिनिधी:
उदय गर्जना न्यूज महाराष्ट्र  अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जत ची आज मासिक बैठक संपन्न झाली. या मासिक बैठकीत जत तालुक्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यामध्ये जत तालुका अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र ऐनापुरे, उपाध्यक्ष  भूपेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष  सुनील सूर्यवंशी,प्रधान सचिव दत्तात्रेय शिंदे, प्रशिक्षण विभाग प्रमुख सय्यद सर, बुवाबाजी संघर्ष विभाग पदी अर्जुन कुकडे महिला विभाग प्रमुख डॉ श्रद्धा सनमडीकर, विविध उपक्रम या पदी नवनाथ संकपाळ सर आदी मान्यवरांची या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली दिनांक 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा शहीद दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच तालुक्यातील अंधश्रद्धा वाढत असल्याने यावर काय उपाय योजना करण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली. कॉलेज च्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या सामाजिक संघटनेत यावे म्हणून विवेक वाहिनी अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्याचे एकमताने ठरले. जादूटोणाविरोधी कायद्याचे यावेळी  सांगली जिल्हा युवा अध्यक्ष रवि सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले. सांगली जिल्हा उपाध्यक्ष इब्राहीम नदाफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर बाळासो वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule