जत पंचायत समितीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावेत - प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.


जत:प्रतिनिधी
         जत पंचायत समिती शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघानी केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकाने गेली दोन वर्षे कोरोनासारख्या महामारीत  ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची अंमलबजावणी, ज्या ठिकाणी साधी मोबाईलला रेंज नव्हती अशा वाड्या वस्तीवर मुलांना ऑफलाईन शिकता  यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे, यासाठी काही शिक्षकांनी  ऑफलाईन अँप्सची निर्मिती केली आहे. मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुलांना त्यांच्याच बोली भाषेतील पुस्तक  डिजिटल स्वरूपात साहित्य निर्माण केले.शिक्षणातील नव-नवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेत महत्वपूर्ण बदल घडविले आहेत. विविध अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले. विद्यार्थ्यांना 'योगा' सारख्या अन्य शारिरीक शिक्षणाचा परिचय घडविला आहे. संगीत कलेचा प्रभावीपणे उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांना कला आणि संस्कृतीचे ज्ञान दिले.शैक्षणिक वर्षात अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्याची किमया त्यांनी केली आहे. व्यावहारिक उदाहरणाद्वारे अभ्यासक्रमातील विविध संकल्पना समजावून देण्याची  त्यांचे कौशल्ये  यासारख्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसह  दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांच्या कार्याची दखल म्हणून तालुकास्तरावरून आशा आदर्शवत शिक्षकांना गौरविण्यात आले पाहिजे. असे मत प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर यांनी केले आहे.
       आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांगिण शिक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल्याधारीत शिक्षणावर भर देवून विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर आणि जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घडवून आणला जातो शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना सन्मानित करण्यात यावे.
      यापूर्वी  हे पुरस्कार दिले जात होते. सन २०१७/१८ सालापासून हे पुरस्कार देण्याचे बंद केले आहे. तरी या वर्षी जत तालुक्यातील प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा. अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात अली आहे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule