प्रभागामध्ये श्रीकांत सोनवणे यांनी केले मुरुमीकरण जतच्या प्रभाग ८ मध्ये रस्त्याचे मुरुमीकरण, डागडुजी

 

जत (प्रतिनिधी) : /PSK NEWS NETWORK
जत शहरातील प्रभाग आठमधील सर्व वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांवर जेथे पावसाचे पाणी साचले आहे, त्याठिकाणी बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ते दुरुस्त करून घेतले. 

प्रभाग क्रमांक आठमध्ये बऱ्याच दिवसांपासून छत्रीबाग रोड, पठाणसाब मंदिर, पाटील गल्ली, रामराव नगर व इतर काही परिसरामध्ये गटारीचे घाण पाणी आणि पावसाचे पाणी थांबून राहत असल्यामुळे येथील लहान मुले व नागरिकांना बऱ्याच रोगराईला व आजारांना सामोरे जावे लागत होते. तसेच रोड वरती चिखल होत असल्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांनी हा होणार त्रास बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांना सांगितला. त्यावर उपाय काढत श्रीकांत सोनवणे यांनी त्या परिसरातील रोडवरती समोर थांबून मुरुमीकरण करून घेत जेसीबी मशीनच्या साह्याने ठीक ठिकाणी साचणारे गटारीचे घाण सांड पाण्याचे खड्डे मुजवून घेतले व गटारीच्या घाण पाण्याला वाट करून दिली.यावेळी श्रीकांत सोनवणे, तानाजी वाघमारे, अब्दुल शेख, सागर माळी, शशिकांत शिनगारे, विश्वजित (गोटू) शिंदे, संतोष बाबर उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक