*"आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ हरपला"**आरपीआय (आठवले गटाचे) सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे निधन


विटा  -10/2020

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे विटा येथे आज दुःखद निधन झाले.
संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बुलंद नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सडेतोडपणे आयुष्यभर झटणारे , सर्वसामान्यांचे आधारस्तंभ अनेकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, प्रशासनामध्ये हातखंडा असलेले निर्विवाद व्यक्तिमत्व, बाबासाहेब कांबळे यांचं आज आकस्मित निधन झाले आणि संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली.
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खानापूर तालुकाध्यक्ष म्हणून तब्बल २८ वर्षे काम पाहिले आणि सध्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना बाबासाहेब कांबळे यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळ घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी बाबासाहेब कांबळे यांचे सर्वश्रेष्ठ योगदान आहे. आक्रमक आंदोलन शैली, प्रभावी वक्तृत्व आणि प्रसंगी न्याय व हक्कासाठी समोरच्याला घाम फोडणा-या ची ताकद असलेले असे हे धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. 
   बाबासाहेब कांबळे यांनी विटा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावून सार्थकी प्रयत्न यशस्वी केले होते. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे विस्वासू सहकारी म्हणून बाबासाहेब कांबळे यांची ख्याती होती. बाबासाहेब कांबळे यांच्यावर पुत्रवत प्रेम सदैव आठवले साहेबांचे राहिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांची ही चळवळ चालवत असताना बाबासाहेब कांबळे यांनी आपल्या तेजस्वी नेतृत्वातून खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम केले अशा या धुरंधर व्यक्तिमत्त्वाचं आज अकाली निधन झाले.
दिवंगत बाबासाहेब कांबळे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐
रिपब्लिकन पाटिॅ आॅफ इडिया(आठवले)सांगली जिल्हा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक