नवनाथ कदम कोसारी (मुंबई पोलीस ) यांनी गुळवंची विद्यालयाला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले*


जत.
  कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा गुळवंची येथील भारतरत्न   डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची शाळेतऑनलाईन  शिक्षण चालु ठेवले आहे . अशा परस्थीतीत समाजाचे आपन काही तरी देने लागतो या उदात्त भावनेणे कोसारी गावचे युवक नवनाथ कदम(मुंबई पोलीस) यांनी  इयत्ता दहावी मध्ये अध्यापन करणाऱ्या  काही गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे  वाटप केले . तसेच गावातील इतर दानशूर व्यक्तींनी सुद्धा शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वाटप करावे असे आव्हान नवनाथ कदम यांनी केले. मुख्याध्यापक दिनकर खुटाळे यांनी विद्यालयामधील सर्व विध्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.  कार्यक्रमासाठी बसवराज येलगार सर,   जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ सांगली. सामाजिक कार्यकर्ते  दिगंबर गोरे, रावसाहेब खरात, संभाजी खटके,  गुळवची विद्यालयाचे गुरव सर, बाबर सर, सरगर सर, घोडके मॅडम,  राजेंद्र फोन्डे, चंदू पवार  इत्यादी  मान्यवर उपस्तीथ होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule