वीज सुरक्षा साधने व कोविड-१९ सुरक्षा साधने न दिल्यास ELA चे थाळी नाद आंदोलन



जत/प्रतिनिधी:
सांगली मंडळ कार्यालय वीज सुरक्षा साधने व कोरोना सुरक्षा साधनाचे वरील आदेश येऊन देखील लाईनस्टाफ ना वाटप करण्यात आले नाही. 
त्यामुळे ELA या संघटनेने १५ दिवसात वीज सुरक्षा साधने व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणारी सुरक्षा साधने खरेदी करून प्रत्येक विभागामार्फत वाटप न केल्यास सांगली मंडळ कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे सुनिल माने यांनी सांगितले. 

सध्या वारा वादळाचे व पावसाचे दिवस असताना लाईनस्टाफना विजेची सुरक्षा साधने व कोविड-१९ पादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही साधने न दिल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. MSEDCL ही आशिया खंडातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. सर्व शहरी व ग्रामीण भागात रात्रंदिवस वीज सुरळीत ठेवण्यासाठी लाईनस्टाफ अथक परिश्रम घेत आहेत, कोरोना काळात सर्वाना घरात बसण्यासाठी वीज सुरळीत ठेऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे, पण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सांगली मंडळ कार्यालय जबाबदारी घेत नाहीत. 
इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन चे केंद्रीय पदाधिकारी सुनिल माने आणि पदाधिकारी यांनी वारंवार भेटून सांगली मंडळ कार्यालयातील अधिकारी यांना सुरक्षा साधने देण्यासाठी विनंती केली परंतु निगरगठ्ठ प्रशासन याची कोणतीच जबाबदारी घेत नाही. प्रत्येक दोन वर्षाला सुरक्षा साधने वाटावी असा आदेश आहे, तसे तर प्रत्येक वर्षी सुरक्षा साधने देणे गरजेचे आहे. परंतु मुख्यालयाचे पत्र येऊन देखील सांगली मंडळ कार्यालय प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे ELA या संघटनेने १५ दिवसात वीज सुरक्षा साधने व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणारी सुरक्षा साधने खरेदी करून प्रत्येक विभागामार्फत वाटप न केल्यास सांगली मंडळ कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे सुनिल माने यांनी सांगितले. तसेच विजेची देखभाल करताना कुणाचा प्राणांतिक किंवा अप्राणांतिक अपघात झाल्यास सुरक्षा साधने न पुरवणाऱ्या सांगली मंडळ कार्यालयावर जबाबदारी राहील असे सांगितले. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन सांगली जिल्यात जर कुणाचे बरेवाईट झाल्यास त्यालाही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षा साधने न पुरवणारे सांगली मंडळ कार्यालय जबाबदार राहील असे पत्र महावितरण मुख्यालय मुंबई यांना तसेच प्रादेशिक कार्यालय पुणे, परिमंडळ कार्यालय कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांना देण्यात आले आहेत. तरी लवकरात लवकर सुरक्षा साधने देऊन लाईनस्टाफ यांची जिवाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडावी अशी ELA संघटनेची अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule