करजगी येथे मागासवर्गीयांवर अन्याय राशन दुकानचे लायसन्स् रद्द करून संबंधितावर कारवाई करा ...अन्यथा तालुकाभर आंदोलन छेडु. - बसप ,जत


प्रतिनिधी जत
 करजगी ता. जत येथील सरकार मान्य् स्वस्त् धान्य् दुकान श्री. अशोक रेवणसिध्द् जेऊर हे चालवित असून सदर रेशन दुकानामध्ये गावातील मागासवर्गीय व इतर समाजातील लोक रेशन आणणेसाठी गेलेनंतर सदर दुकानदार धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देतात.  धान्य् कमी का दिले याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ् नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलतात.
तसेच शिवीगाळ व दमदाटी करतात व माझे विरुध्द् कोठेही तक्रार करा असे बोलतात व पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या गावातील रेशन दुकानातून धान्य् घेऊन जाणेस सांगतात.  तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी या व्यक्तीरिक्त् इतर लोकल मार्केट मधील चहापूड, खाद्यतेल, खोबरेल तेल, कपड्याचे साबण, अंगाला लावयचा साबण, कपडे धुण्याचे पावडर व अन्य् वस्तू सक्तीने विकत घ्यायला लावतात व त्याशिवाय स्वस्त् धान्य् दुकानातील माल मिळत नाही.  सदरच्या वस्तू बाजार भावापेक्षा जास्त् दराने लोकांना विक्री करतात.
कोविड 19 काळामधील शासनाकडून मिळणारे मोफत धान्य् वाटप नियमानुसार झालेले नसून याची सखोल चौकशी करावी. संबंधित करजगी या गावातील अन्यायग्रस्त् मागासवर्गीय व इतर समाजातील लोकांनी दि. 16/09/2020 रोजी लेखी तक्रार दिली आहे व संबंधित विभागाच्या निरीक्षकांनी या दुकानाचा पंचनामा व गावातील 56 लोकांचे जबाब नोंदविलेले असून अद्यापही त्यांचेवर कारवाई झालेली नाही तरी सदर करजगी येथील सरकार मान्य् स्वस्त् धान्य् दुकानचे लायसन्स् रद्द होऊन दुकानदार श्री. अशोक रेवणसिध्द् जेऊर यांचेवर कारवाई करावी अन्यथा आम्हास आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल. असा इशारा बहुजन समाज पक्षाने दिला आहे. व याबाबत चे निवेदन मा. तहसीलदारसो. जत  व प्राताधिकारी यांना दिले , यावेळी  बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, बामसेफ संयोजक महेश शिंदे, प्रभारी गौतम सर्जे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन व अखिल भारतीय संत रविदास परिषद प. महाराष्ट्र अध्यक्ष किरण शिंदे, जत तालुका अध्यक्ष अरुण साळे व करजगी गावातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते.

       मा. तहसीलदारसो. जत 
   मा. प्राताधिकारी, जत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule