वळसंग ता.जत येथे भीषण अपघात एकाची प्रकृती चिंताजनक, १०८ अम्बुलंस सेवा ‘नॉट रीस्पोंडीग


प्रतिनिधी माडग्याळ 
वळसंग ता.जत येथे भीषण अपघात  झाल्याची घटना सोमवार दि. ०७.०९.२०२० रोजी दुपारी २ .वाजताच्या सुमारास घडली. मोटार सायकल (MH १० , ८२५६)  व मारुती कार (MH १० CA १७५४ ) यामध्ये घडली या अपघातात  एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे.वळसंग जत रोड वर १ किमी अंतरावर हा अपघात झाला , घटनास्थळा वरील जमावाच्या सांगण्या नुसार हा अपघात मारुती कार आणि दुचाकी ची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवत होते , अपघात ग्रस्त हे सोरडी या गावचे असाल्याचे समजते, घटना स्थळावरून शासनाची रुग्णवाहिका १०८ सेवा देणाऱ्या या नंबर वर फोन केला असता एकही फोन घेतला गेला नाही शेवटी बघ्यांमधून च एक मदतीचा हात आला त्या इसमाने आपल्या स्वतःच्या ओमनी गाडी तून , वळसंग मधीलच तरुणाच्या मदतीने  त्या तीनही जखमींना तातडीने सरकारी रुग्णालय जत येथे दाखल केले , तोपर्यंत या अपघात ग्रास्तांचे नातेवाईक त्याठिकाणी आले , प्रसंगवधान राखत या तरुणानी केलेल्या मदतीने नातेवाईक व घटनास्थळावरील लोकांनी या तरुणांचे आभार व कौतुक केले.

 *राखीव रुग्णवाहिकांची गरज* 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्नासंख्ये मुळे प्रशासनाची आरोग्याविभागाची तारांबळ उडाल्याचे स्पष्ट चित्र आपण पाहत आहोत त्यातच आता कम्युनिटी स्प्रेडींग चा टप्पा चालू असून रुग्ण संख्येत वाढच होत चालली आहे , परिणामी रुग्णवाहिका कमी पडत आहेत, तेंव्हा अश्या अपघाता सारख्या घटना घडल्यावर रुग्णवाहिका वेळेत न आल्याने एकाध्याचा जीवही जाऊ शकतो, ही वेळ येऊ नये यासाठी प्रशासनांने तसेच आरोग्य विभागाने अपघात ग्रस्तांसाठी राखीव रुग्णवाहिका  उपलब्ध करून द्याव्यात असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विकास लेंगरे वळसंग  व मदतीस धावून आलेले ओमनी चालक समीर पटेल यांनी आपले  मत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule