बहुजन समाजाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील "संस्थात्मक" यंञणेच्या आधाराची गरज

बहुजन समाजाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील "संस्थात्मक"  यंञणेच्या आधाराची गरज..!
✍✍✍✍✍✍✍✍✍
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंञ मजुर पक्ष,शेड्युल कास्ट फेडरेशन सारख्या राजकीय पक्षांची निर्मिती करून शोषित,पिडित समाजाला "न्याय" मिळवुन देण्याचा प्रचंड मोठा यशस्वी प्रयत्न केला.तर पुढे सबंध भारतीयांना सामावुन घेणारा एक राजकिय पक्ष असावा अशा उदात्त हेतुने RPI ची संकल्पना मांडली.तिची ध्येय,उद्दिष्ट्ये,आणि कार्यप्रणाली ही ठरविण्यात आली.तसेच समता सैनिक दल व तिची कार्यप्रणाली बाबासाहेबांनी सांगितली.तर दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ची निर्मिती ही बाबासाहेबांनी केली.या सगळ्या संस्था आणि संघटनांची निर्मिती करत असताना या संस्था व संघटनांची घटना आणि भविष्यकालीन कार्यप्रणाली ही बाबासाहेबांकडुनच लिहुण घोषीत करण्यात केली.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मान केलेल्या संस्था व संघटनांची कार्यप्रणाली आणि ध्येय व उद्दिष्ट्ये ही बहुजन व्यापी बहुजन समाजपयोगी आहेत.यात तिळ माञ शंका नाही.जसे,दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे पुढील प्रमाने आहेत.आपण प्रत्येकाने जर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मान केलेल्या संस्था व त्यांच्या घटनेचा अभ्यास केला तर आपणास लक्षात येईल की,बाबासाहेबांची संस्थात्मक यंञनेतुन बहुजन समाजाला परिवर्तनाच्या आंदोलनात  जोडण्याची इच्छा शक्ती खुपच दांडगी होती.याचीच प्रचिती या सोसायटीच्या कार्यप्रणालीचा अभ्यास केल्यास दिसुन येईल.बाबासाहेबांनी सोसायटीच्या संविधानात उल्लेखलेली कार्यप्रणाली आपण सर्वांनी अभ्यास म्हणुन वाचुन पहावी.
१) भारतात बौध्द धर्माच्या प्रसारात वाढ करणे
२)बौध्दांच्या पुजा-उपासनेसाठी विहारांची स्थापना करणे.
३)धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांबाबत शाळा आणि काॅलेजेसची स्थापना करणे.
४)अनाथालये,दवाखाने आणि मदत केंद्राची स्थापना करणे.
५)बौध्द धर्माच्या प्रसारार्थ कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौध्द पाठशाला-उच्च विद्यालयांची स्थापना करणे.
६) सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याबाबत वाढ करणे.
७)सर्वसामान्य जनसमुहाला बौध्द धर्माचा सत्य-खरा अर्थ समजण्यासाठी छापील हस्तपञिका आणि छोठ्या-छोठ्या पुस्तिका प्रसिध्द कराव्यात आणि बौध्द साहित्याचे जाहिर प्रकाशन करण्याचे जबाबदारी पत्कारणे.
८)गरज पडल्यास नविन धर्म-उपाध्यायांचा,धर्मोपदेशकांचा वर्ग निर्मान करावा.
९)प्रकाशनाचे काम चालु राहण्या प्रत्यार्थ छापखाना किंवा छापखाने निर्मान करणे.
१०)भारतीय बौध्दांची समान कृती-कार्ये करण्यासाठी आणि सत् संगतीसाठी संमेलने आणि परिषदा घेण्यात याव्यात.
डाॅ.बाबासाहेबांनी दिलेली ही कार्यप्रणाली,ध्येय व उद्दिष्ट्ये जर आपण प्रत्येकाने पाहिली आणि वाचली तर आपल्या लक्षात येते की,या उद्येशातील काही धार्मिक बाबी सोडल्या तर यातील बहुतांष उद्येश्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजपयोगी विविध गरजेच्या "संस्थात्मक" बांधणीवर मोठा जोर दिलेला आहे.परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाना नंतर बाबासाहेबांच्या अपेक्षे प्रमाणे बहुजन उपयोगी संस्थात्मक बांधणीच्या कामाला बगल देवून,वारसवीरांनी आहे त्याच संस्था व संघटनांना खुडून खाण्याचे काम सुरू केले.परिनामी देश किंवा राज्यात आंबेडकरी विचारधारा ही फक्त सांगण्याचाच कामापुरती राहिली.त्यामुळं आपण अर्थात नेता व बुध्दीजिवी आणि आंबेडकरी चळवळ बहुजन उपयोगी विधायक कामापासुन कोसो दुर जात राहिली. बाबासाहेबांनी बहुजन समाजाला विविध सस्ता स्थानांच्या माध्यमातुन जोडण्याचा प्रयत्न केला.कारण परिवर्तनवादी विचाराच्या जेवढ्या जास्त समाजपयोगी संस्था तेवढा बहुजन समाज  एकमेकांशी जोडला जाणार याची बाबासाहेबांना खाञी होती.बहुजन समाज हा छोट्या-छोट्या जातीत विखुरलेला समाज अाहे.तो भयग्रस्त आणि समस्याग्रस्त अाहे.त्यासाठी त्यांना अवश्यक ती रसद सामुहिक स्तरावर विविध संस्थाच्या माध्यामतुन पोहचवली जावु शकते.याकडं कोणी सकारात्मक दृष्टीने पाहातच नाही.त्यामुळं सरकारच्या समकक्ष  संस्थात्मक यंञणा उभा करण्याचा विचार आपण पुढे घेवून जावु शकलो नाही.
आपल्याकडं परिवर्तनवादी महापुरूषांची लांबलचक यादी आहे परंतु यांच्याच बहुजन समाजातील पिढी दर पिढीला परिवर्तनाच्या आंदोलनात आनण्यासाठी आपल्याकडं कोणतीच बहुजन समाजाच्या उपयोगी संस्थात्मक यंञना नाही.सरकारच्या समकक्ष संस्थात्मक यंञणा देश व राज्यातील शक्तीशाली "जात" समुह उभा करू शकतो असा आपणास आत्मविश्वास वाटत नाही. हे माञ आपण कधीच कबुल नाहीत किंवा लक्षात घेत नाहीत,किंबहुणा आपणास या शासन समकक्ष यंञणेची गरज वाटत नाही.आज ही खुद्द आंबेडकरी समाजातील विद्ववान तज्ञ लोकांनी अनेक राजकीय पक्षांची आणि बामसेफ "अबकड" नावाने कर्मचारी संघटना उभा केल्या परंतु त्यापैकी एक सुध्दा संघटन साधे "बाल संस्कार सेंटर" आणि एखादी "पतसंस्था" उभा करू शकले नाही,तिथं बॅंका,काॅलेज,महाविद्यालय,
सहकारी कारखाने,विविध उद्योग समुह,
दवाखाने, अनाथालय, वस्तीगृह इत्यादी संस्था यांचा तर विचार सोडाच,पण यांना वाटतं की,अशा बहुजन समाजपयोगी संस्था उभा करणं आपले कामच नाही.खरं तर देश व राज्यात ज्या पध्दतीनं प्रस्थापित लोक सहकार क्षेञावर ताबा ठेवून राजनिती मध्ये भक्कमपणे उभा आहेत,ही पध्दत आपणास का जमत नाही किंवा गरजेची वाटत नाही ? परंतु राजकारणात माञ गल्ली पासुन ते दिल्ली पर्यंतचा कार्यकर्ता व नेता भाषणं माञ "मुख्यमंञी व पंतप्रधान" होण्याची करताना दिसत असतो.मिञानों....खरं पाहाता आपण सर्वच जन आप-आपल्या नेत्यांची "लाल" म्हणण्यासाठी अहोराञ कुठेही आप-आपसात भांडणे करत असतो.आपल्या नेत्याप्रतीची भक्ती बाजुला ठेवुन थोडं खरं सांगा की,आप-आपल्या संघटना व नेत्यांच्या कोणत्या भुमिका खुद्द आंबेडकरी समाजातील गोर-गरिबांच्या,नाहीरे वर्गाच्या वास्तववादी समस्यांप्रती काम करतात ?? काय खरच आपल्याकडं बहुजन उपयोगी संस्थात्मक यंञना आहे का ?? जसे बाबासाहेबांनी दि.बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या कार्यक्रमा मध्ये नमुद केले आहे !त्यापैकी एक तरी संस्था आप-आपल्या नेत्याने किंवा संघटनेने उभा केली आहे काय ? अरे किती दिवस नुसतेच कोरडी भाषणं लोकांना द्यायची ?आपल्या समाजाचे सोडा निदान एखाद्या आदिवासी,वाडी,वस्तीवर तरी आपण पोहचलो आहोत काय ?? मला राष्टपती करण्यापेक्षा एखाद्या अदिवासी मानसाला करा म्हणनं खुप सोप्प आहे.परंतु तशी शक्तीशाली यंञना आहे का आपल्याकडं ?? याचा थोडा तरी विचार करावा.म्हणजे आपल्या लक्षात येईल की,आपण आत्ता पर्यंत नाव तर बाबासाहेबांचे घेतो परंतु बाबासाहेबांनी उभा केलेल्या सामाजिक,धार्मिक आणि राजकीय क्रांतीची अंगणवाडी सुध्दा पास करू शकलो नाहीत.बाबासाहेबांच्या अथक त्याग आणि परिश्रमातुन आपली मंडळी शिकली सवरली,सरकारी नोकर्‍यात ही गेली.यांनी शिकुण सवरुन वेग-वेगळ्या बामसेफ नावाला जोडुन अनेक संघटना नाॅन पाॅलिटिकल आणि नाॅन रिलिजियस म्हणुन बाजारात मोठ-मोठाली स्वप्ने सांगुन आणल्या खर्‍या परंतु आत्ता पर्यंत कोणत्या एका क्षेञात या संघटनांनी क्रांती केली. याचे साधे एक उदाहरण सुध्दा पाहायला किंवा सांगायला मिळत नाही.लय झाले तर ही पैशेवाली मंडळी इकडं जमिन घेतली आणि तिकडं जमिन घेतली अस सांगतात ? कदाचित हे खरं ही असतं,परंतु यांच्या कामातुन बहुजन समाजातील सोडाच खुद्द आंबेडकरी समाजातील सर्वसामान्यांच्या समस्या सुटतात काय ?? तसेच आपण ज्या गावात,शरात राहतो तिथं माञ आपल्याला काहीच समाजोपयोगी संस्थात्मक काम उभा करता येवु नये.ही खुप मोठी शोकांतिका आहे.आपल्या गावात शिक्षक,प्राध्यापक,वकिल,डाॅक्टर,इंजिनियर,
उद्योग व्यवसायवाले बुध्दिस्ट लोक आहेतच ना ?? काय करतात ही मंडळी ? यातील बहुतांश मंडळी स्वता:हाच्या परिवाराच्या पालन पोषनात आनं हाॅलिडे साजरा करण्यात व्यस्त असतात.काय बोलाय जावं तर यांच्याकडं एक ठरलेले उत्तर असते.आम्ही बाहेरून आलेले आहोत बाबा ! अरे....बाबानों समाजपयोगी कार्य करण्यासाठी कूठून आलोत हे महत्वाचे नसते.गरजेची असते ते म्हणजे समाजाप्रती संवेदनशील असण्याची ! सध्यस्थितीला खुद्द आंबेडकरी समाजात खुप कौतुकास्पद विभागणी आणि त्यात प्रचंड मोठी दरी निर्मान होताना दिसत आहे.ती म्हणजे श्रीमंत आंबेडकरवादी आनं गरिब आंबेडकरवादी ? आज आंबेडकरी समाजामध्ये जी मुलं शाळा नीट पणे शिकु शकली नाहीत त्यांनी विविध प्रस्थापित मनुवादी/गांधीवादी राजकीय पक्षात प्रवेश घेवुन  गुत्तेदारी करायची तर काहींनी ज्या गटाची चालती आहे अशा आंबेडकरी पक्षात प्रवेश घेवून आयुष्यभर वेग-वेगळ्या स्तरावर/पदावर कायम राहुण विविध निवडणुकीत "बारगेनिंग/चळवळीची दलाली करत सत्तेची भाषनं ठोकत राहायची तर ज्यांच्याकड पद,प्रतिष्टा आणि नौकरी आहे त्यांनी कोणत्या तरी कर्मचारी संघटणेत प्रवेश करायचा आणि  सांगायचे की,आम्हाला प्रस्थापित सरकारच्या विरोधात सरकारशी समकक्ष/बरोबरीची अशी स्वतंञ संस्थात्मक यंञना उभी करायची आहे,जी यंञना मुलनिवासी समाजाचं संरक्षण करेल.खरं पाहता नविन नविन अशी भाषनं ठोकणारी मंडळी अध्यक्षाला फंड भरून भरून कालांतराने निराश होवुन आपल्याच अध्यक्षाला शिव्या घालताना दिसतात.परंतु समाजातील नाहीरे परिवारातील विद्यार्थ्यांना मदत करू शकत नाहीत.परंतु आंबेडकरी समाजातील गोर-गरिब जनतेने/युवावर्गाने/कार्यकर्ता मंडळाने/ लोकांनी माञ भावणिक होवुन बाबासाहेबांच्या फोटोमुळं आणि निळ्या रंगाचा तुकडा असलेल्या झेंड्यामुळं मोठ्या आशेनं या शेखी मिरवणार्‍या बुध्दिजिवीची कामे करायची आनं बेलगाम बिकाऊ,अहंकारी राजकारण्यांना "मतदान" करायचे आणि कर्मचारी संघटणेवाल्यांच्या तोंडाकडं पाहात बसायचे. आत्ता तुम्हीच सांगा या कर्मचारी संघटन व आंबेडकरी राजकीय पक्ष या दोन्ही पैकी कोणी तरी एकाने गाव नाही तर नाही किमान जिल्हास्तरावर तरी एखादी "संस्थात्मक यंञना" चांगल्या प्रकारे उभी करू शकले आहेत ? तिथं बौध्द व इतर समाजातील गरजु लाभार्थी लाभ घेतील ? खरं पाहता कार्यकर्ते तर या सर्वांनाच पाहिजे आहेत ??? मग कार्यकर्त्यांची जबाबदारी का नको ?? का अशा महत्वाच्या मुद्यांवर आपण व आपल्या विविध सामाजिक,धार्मिक व राजकीय संस्था व पक्षांनी बोलायचेच नाही ?? आज आपल्या याच पक्ष आणि संघटनांच्या साक्षीने भारतीय "संविधानाला" अपयशी "संविधान" म्हणुन ठरविण्यात येत आहे.खाजगीकरणाचा सपाटा लावुन संवैधानिक शिक्षण व नौकर्‍याचे "आरक्षण" संपविले जात आहे.आज तरडेवर तुटून पडणारी भीमसैनिक मंडळी प्रस्थापित राजकीय पक्षात विविध सत्तापदाचा लाभ घेणार्‍या आपल्याच हारामखोर नेत्यांविषयी,प्रतिनिधी व कार्यकर्त्यांवर बोलत नाहीत.जे भारतीय संविधानाला पायदळी तुडवुन प्रस्थापितांच्या मांडीला-मांडी लावुन सरकारच्या योजनांचा फायदा घेतात अशांवर व  सरकारवर तुटून पडताना दिसत नाहीत.निवडणुका सारख्या महत्वाच्या लढाईत प्रस्थापितांची चड्डी सुध्दा धुवायला यांना लाज वाटत नाही.मग कसे आपण संविधानाचे संरक्षण करणार ? हात-पाय तोढुन टाकण्याच्या आणि अश्लिल शिवीगाळीच्या भाषनांनी बाबासाहेबांचे आंदोलन यशस्वी होईल का ? सरकारी क्षेञ खतम म्हणजे संविधान खतम हे आपण समजुन घेण्यास आज ही तयारच नाहीत.दिवसें-दिवस आंबेडकरी आंदोलन आणि आंबेडकरी समाजाचे नुकसान वाढतच चालले आहे. तरी सुध्दा आपल्या पोकळ भाषनं
बाजीला आवर घालण्याची आक्कल आपल्या नेत्यांना वा बामसेफींना का येत नाही.यास काय म्हणावे ?? बाबासाहेबांनी ज्या संस्था आणि संघटना निर्मान केल्या त्यातुन आपण आदर्श घेणार आहोत नाहीत ? त्यांच्या संघठना व त्यांच्या उद्येश्य व ध्येयाची व्याप्ती लक्षात घेणार आहोत की नाहीत ? आंबेडकरी आंदोलनात 
बहुजन समाजाला जोडण्यासाठी नुसत्या पोकळ भाषणाचीच अवश्यकता आहे का ?? बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे संस्थात्मक यंञानाची गरज नाही का ?? अरे...बाबानों,आपल्या स्वता:हाच्या मुलांना शाळेत पाठवायला आपली एखादी धार्मिक शाळा तरी आहे का ?? बाहेर मोठ्या दिमाखात बुध्दिष्ट म्हणवून घेतो पण आपलचं "रक्त" शाळेत गणेश आरती आनं सरस्वती विद्येची देवता अस शिक्षण घेत असते,याची थोडी सुध्दा लाज आम्हाला वाटत नाही.बहूजन समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी बॅंका व पतपेढ्या आणि दवाखाणे,वस्तीगृह तर सोडाच,आपल्या समाजातील शिक्षित नोकरदार मंडळी करोडों रूपयाने फंड आप-आपल्या संघटनांकडे जमा करतात,यातुन वार्षिक आधिवेशनेच होतात ना ?? काय आपल्या 24,25,100...
व्या वार्षिक अधिवेशनाने बहुजन समाजातील गरजुच्या गरजा संपविण्यास थोडी तरी मदत होते का ?? बेशक आपण आपल्या संघटनांचा उदो-उदो करावा,परंतु याचा थोडा तरी फायदा बहुजन समाजाला होतो का याचा विचार आपण केला पाहिजे.अस्तित्वात असलेल्या संस्था आणि संघटनांच्या कार्यातुन बहुजन समाज उपयोगी काम होते का ?? आपल्या संस्था आणि संघटनांची टिमकी जरूर मिरवावी परंतु ती संघटना समाजात का रूजत नाही याचा ही विचार होणे अपेक्षित आहे.दर पाच वर्षाला बहुजन समाजाला नुसतीच "मते" मागुन जमेल का ?? शाळा,महाविद्यालय,पतपेढ्या,सामाजिक संस्था,दवाखाणे,वस्तीगृहे हे प्रस्थापितांचीच आहेत.तर आपण पण ती का उभी करू नये ?? यावर ही आप-आपल्या संस्था,संघटनांमध्ये चिंतन मनन होणे गरजेचे आहे.तरच आपण आपल्या संस्था आणि संघटनांच्या माध्यमातुन बहुजन समाजाला न्याय,प्रशिक्षितपुर्णवेळ कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज उभा करु शकतो आणि बाबासाहेबांच्या समाजिक,धार्मिक व राजकीय आंदोलनास यश प्राप्त करून देवु शकतो.
✍✍✍✍✍✍✍✍
प्रा. विजय भालेराव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule