उमदी येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालया तर्फे कीड नियंत्रण प्रात्यक्षिके दाखवताना कृषिदूत व ग्रामस्थ

 

 

जत/प्रतिनिधी:
नेसरीच्या रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कु.श्रीशैल अभिमन्या लोणी या कृषीदूताने ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमदी ता.जत ,जि. सांगली येथे नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण कसे करावे ,याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले .सुरुवातीला सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक कु. श्रीशैल अभिमन्या लोणी यांनी केले .त्यानंतर कीड नियंत्रण करताना कोणकोणते ट्रॅप्स व ल्युअस वापरतात.तसेच वापरण्याची पद्धती यांचे संपूर्ण प्रात्यक्षिक करुन दाखवले . एकरी प्रमाण व ल्युअर बदलण्याचा कालावधी हे सर्व शेतकऱ्यांना सांगितले . तसेच सदर प्रात्यक्षिक करत असताना शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन कुमार श्रीशैल अभिमन्या लोणी या कृषीदूताने केले. सदर प्रात्यक्षिक covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडले .प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. बी. बिरादार , समन्वय प्रा .एम. डी. माळी , कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. बी. कडपे , विषय प्रमुख प्रा. एल. कोरवर यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule