प्रभाकर सनमडीकर यांचे अल्पशा आजाराने निधन


जत /10प्रतिनिधी 
       जनसुराज्य पक्षाचे जत तालुक्यातील नेते प्रभाकर लाह्याप्पा सनमडीकर (वय 59) यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने गुरुवारी पहाटे निधन झाले. 
 जत येथील जनसुराज्य पक्षाचे नेते तथा शाहुवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांचे स्वीय
सहाय्यक  सनमडीकर हे आंबेडकरी चळवळीतील नेते होते. शिखर बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेनंतर ते आ. कोरे यांचे पीए म्हणून कार्यरत झाले होते. 2009 साली त्यांनी जत राखीव मतदारसंघात जनसुराज्य पक्षातून विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या दहा दिवसा पासून ते आजारी होते, सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणजोत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते. कार्यतत्पर , हुशार संघटन कौशल्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जतचे  संस्थापक, व जत तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जत तालुकाध्यक्ष होते. राजकारणी,समाजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाणारे बौद्ध समाजाचे व बहुजन परिवर्तन  चळवळीचे नेतृत्व हरपले अशा प्रतिक्रिया लोकांच्यातून आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक