जत येथे शासनामार्फत मका व उडीद खरेदी केंद्र सुरु करा - प्रकाश जमदाडे
जत/प्रतिनिधी: जत हा महाराष्ट्रातील शेवटचा तालुका तसाच हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
हा तालुका महाराष्ट्रतील सर्वात मोठा तालुका असून 53 गावे खरीप तर 67 गावे रब्बी पिकाखाली येतात. तालुक्यातील खरीप क्षेत्र 45000 हेक्टर पेरणी झालेले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तालुक्यातील अनेक शेतकरी हक्काचे पीक म्हणून मका आणि उडीद पेरणी करीत आहेत यावर्षी देखील काही भागात पाऊस चांगला झाला आहे. शेतकऱ्यांनी साधारणपणे 5000हेक्टर क्षेत्र उडीद व 7000 हेक्टर क्षेत्र मका पेरणी केली आहे. पाऊस चांगला असल्याने उत्पादन देखील चांगले आले आहे राज्यशासनाने उडीद हमीभाव 6100 रुपये तर मका 1760 रुपये जाहीर केला आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून उडीद 4500 ते 5200 रुपये तर मका 1200 ते 1350 या दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे जत व परिसरातील उत्पादित केलेले पीक हे येथेच शेतकऱ्यांना विकता किंवा खरेदी करता यावे यासाठी राज्यशासनाने खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी जत मार्केट कमिटीचे मा.सभापती तथा केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी निवेदनद्वारे नायब तहसीलदार विभुते यांच्याकडे केली आहे.यावेळी निगडी (खुर्द ) चेअरमन बाळकृष्ण शिंदे,माजी सरपंच अशोक गायकवाड, सचिन माने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा