ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षक दिन साजरा


जत/PSK NEWS NETWORK
ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधुन  शिक्षक दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन जगन्नाथ वायदंडे,वरिष्ठ मुख्याध्यापक खैराव तर  प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव शिंदे,भारत क्षिरसागर  जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संस्थेचे सचिव तथा ग्रां.पं.सदस्य संतोष पाटील हे उपस्थित होते. 
     प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनीनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक शिक्षक श्री. दत्तात्रय चौगुले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेतील सहशिक्षिका सौ.प्रियांका काशीद (मॅडम) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून असलेले येळवी शाळेचे मुख्याध्यापक भारत क्षीरसागर (सर) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत पूर्वीचे शिक्षण आणि आताचे शिक्षण यात असणारा बदल सांगितला हा बदल स्वीकारून भविष्यात यशस्वी व्हावे.
सुखदेव शिंदे केंद्रप्रमुख यांनी ही मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले त्याचबरोबर संस्थेचे सचिव संतोष पाटील यांनी ही मार्गदर्शन केले.  अध्यक्ष जगन्नाथ वायदंडे यांनी शिक्षणात होणारा आमूलाग्र बदल स्वीकारणे गरजेचे आहे. सध्या विद्यार्थ्यांना व  विद्यार्थ्यांनीनी शिक्षणाची अत्यंत गरज आहे.भौतिक साधनांचा सुळसुळाट झाला असून त्या साधनाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होत आहे. असे न करता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या  कष्टाने मेहनतीने मोठमोठ्या पदापर्यंत मजल मारावी. तसेच आपले ध्येय निश्चित करून अभ्यासाला सुरुवात करावी असा संदेश दिला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
      सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संस्थेचे संस्थापक सचिव संतोष पाटील  यांनी केले यावेळी प्रशालेतील 11 वी व 12वी चे विद्यार्थी तसेच कृष्णा देवकते व  भारत निळे,गंगणे व इतर शिक्षकेत्तर स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule