अखेर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जत तालुका अध्यक्ष मा श्रीकांत हुवाळे व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचा आर पी आय (A) आंबेडकर पक्षात जाहीर प्रवेश....जिहाध्यक्ष, मा.महादेव होवाळ.
==========================
सांगली :- आज दि. ११/०९/२०२१ रोजी सांगली जिल्ह्यातील जत तालुका अध्यक्ष मा.श्रीकांत हुवाळे (सर) व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) या पक्षामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष मा.महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला त्यांच्याबरोबर सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय देवनाळकर, तालुका सरचिटणीस (माजी सरपंच) मा. बिरुदेव बाबर, युवक तालुका अध्यक्ष मा. नारायण कामत, मुस्लिम आघाडी तालुका अध्यक्ष, मा. शब्बीर भाई नदाफ, मराठा आघाडी अध्यक्ष, मा. महेश कोडग, जत विधानसभा अध्यक्ष, मा. राकेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष, मा. इराप्पा केंगार, व इ. कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्यातील संघटनेमध्ये उभी फूट पडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातील मोठा गट जिल्हा कार्यकारिणीच्या मनमानी कारभाराला आणि एकाधिकारी शाहीला कंटाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)आंबेडकर गटांमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी सत्कार केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर मूस्लिम आघाडीचे तालुकाध्यक्ष शब्बिर नदाफ सरचिटणीस बिरूदेव बाबर यूवा आघाडीचे तालुकाध्यक्ष नारायण कामत विधानसभा अध्यक्ष राकेश कांबळे उपाध्यक्ष इरापा केंगार मराठा आघाडी अध्यक्ष कोडग महेश हजर होते
यावेळी मुस्लिम आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष मा. दस्तगिर फकीर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा