धनगर आरक्षण आणि जिथे तिथे विखुरलेला समाज....
हातात काठी,खांद्यावर घोंगड़ी,पिवळा पटका,पीळदार मिशा,"धनगर,होय "धनगर".दिवसभर मेंढ्यां राखने आणि त्याच्या केसा पासून ऊब दार घोंगड़ी बनवने हा धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय..
डोंगरदरीत,रानावनात,भटकत फिरनारा हा समाज बघितला कि लक्षात येत की जन्मोजन्मीची उपेक्षा यांच्याच नाशिबाला आली आहे.करोंनात सगळे जग थांबले असले तरी धनगर मात्र मेंढ़रा मागेच आहे. त्याना अजुनही lockdown चा अर्थ माहित नसेल.पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त हा समाज आढळतो.धनगरी मटन आणि ढोल त्यावर पारंपरिक नृत्य करत "जय अहिल्या" तर कधी "जय बा लूमामा"असा जयघोष करणारा हा समाज अजूनही शैक्षणिक विकासा पासून कोसो दूर आहे.जेंव्हा हा समाज हातातील काठी टाकून पेन घेऊन शैक्षणिक भरारी घेईल तेंव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भरारी घेईल,.
परवा पंढरपुर मधे धनगर आरक्षण संदर्भात आ. गोपीचंद पडलकर ह्यांनी ढोल बजाओ आंदोलन करून ह्या सरकारला जाग यावी म्हणून विट्ठलाला सा कड़ घातल,त्यानंतर आमचे मित्र क्रियाशील कार्यकर्ते श्री. विक्रमजी ढोने साहेब ह्यांनी त्या वर तिखट प्रतिक्रिया दिली,प्रतिक्रिया थोड़ी तिखट होती पन त्यात थोड़े तथ्य ही आहे.एक लक्षात घेतले पाहिजे की हे दोघेही कार्यकर्ते धनगर समाजाचेच आहेत.भले त्यांचे पक्ष वेगळे असतील पन दोघेही धनगर आरक्षण संदर्भातच बोलतात मग एवढा दुस्वास का?
धनगर आरक्षण बाबत आज पर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी आपली स्वतःचे राजकीय foundation तयार करून अडानी धनगर समा जाला फसवल.ह्याची सुरवात कै. शिवाजीराव शेंडगे पासून झाली.त्यानंतर मा. जानकर,मा. पडलकर हे कार्यक्रत्याचे नेते झाले आणि नेत्याचे आमदार, मंत्री झाले.आपले स्वतःचे foundation तयार करून पद पदरात पाडुन घेतली.बारामती मधे एक लाखा च्या पुढे धनगर समाजा ची हक्काची मते असताना मा. पडलकर ह्याना 30/35 हजार मते मिळतात ह्याचा अर्थ धनगर समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे,इंदापुर चा धनगर राष्ट्रवादी सोबत आहे.सांगोल्याचा धनगर शे का प च्या मागे आहे,करमाल्या चा धनगर शिवसेने सोबत आहे,मान खटाव चा धनगर कॉंग्रेस बरोबर आहे,दौंड चा धनगर भाजपा सोबत आहे,आणि महत्वाचे म्हणजे जत आणि कवठे महांकाल चा धनगर जिकड मलीदा तिकडे चांगभल....
म्हणून आरक्षण घेण्यासाठी सरकार वर दबाव टाकायाचा असेल तर सर्व नेते कार्यकर्ते आपला पक्ष बाजूला ठेऊन समाज एकत्र बांधूंन एकत्र येणे ही काळाची गरज आहे,
तुम्ही विखुरले आसाल तर सरकार वर दबाव आणि न्यायालयिन लढाई कशी जिंकनार?आपला कोन वापर करून घेताहेत का?ह्याचा ही विचार होने गरजेचे आहे.
कुणी बिरोबाला फसवल,कुणी विट्ठला ला फसवल---/-
तुम्हाला कुणी फसवत नाही ना ह्याचा शोध घेणे आवश्यक वाटते.
मनोहर हुवाले
व्हसपेठ,
ता. जत,
8668583994
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा