जत : उपविभागीय अधिकारी यांना हाथरस येथील अनुसुचीत जाती समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार व खून घटनेचाा जाहिर निषेधाचे निवेदन ऑक्टोबर ०५, २०२०
जत प्रतिनिधी :
या ठीकाणी उपविभागीय अधिकारीसो,यांना उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अनुसुचीत जाती (SC) समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून केलेबाबत. आरोपींच्यावर कठोर कारवाई होऊन योगी सरकार बरखास्त होणेबाबत,निवेदन देणेत आले.उत्तर प्रदेश येथील हाथरस या गावातील मनीषा वाल्मीकी या मुलीवर गावातील सवर्ण ठाकूर समाज्यातील तरुणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केली आहे. तसेच जेंव्हा पासून उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार बनून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले आहेत तेंव्हापासून अनुसुचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गींय समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत. जातीवादी मानसिकतेतून त्याठिकाणी कारभार चालला असून मागासवर्गीय लोक दहशतीखाली त्याठिकाणी जगत आहेत.
तरी आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याला कळवू इच्छितो की ज्या जातीवादी ठाकूर समाजातील लोकांनी मनीषा वाल्मीकी हिचा बलात्कार करुन खून केला आहे. त्या सर्व प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या निगराणीखाली सखोल चौकशी होऊन दोषींना 6 महिन्याच्या आत फासावर लटकविले पाहिजे तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करुन त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून त्यांची मठामध्ये रवानगी करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, बामसेफ संयोजक महेश शिंदे, बी.व्ही.एफ सहसंयोजक मेसाप्पा काटे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन इ. उपस्थित होते.
प्रत माहितीसाठी :-
1. मा. महामहीम रामनाथ कोविंद,राष्ट्रपती, दिल्ली भारत.
2. मा. नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री, सचिवालय दिल्ली.
3. मा.चेअरमनसो,अनुसुचित जाती/जमाती आयोग
रकाबगंज दिल्ली.
4. मा. अध्यक्षसो, महिला आयोग दिल्ली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा