विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन चळवळ जिवंत होणे काळाची गरज...
संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले,
पुन्हा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले,
तु पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत कारे,
बाबा तुझ्या मताची माणसं मेलीत कारे
बाबा तुझ्या मताची माणसं मेलीत कारे .....वामन दादा कर्डक
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील एका मागासवर्गीय भगिनीचा नालायक मनूवादी विचारसरणीच्या चार सवर्णांनी तिच्यावर बलात्कार करून तिचा मणका मोडून तिची जीभ कापली.व खून केला.आणि विशेष म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली.अशा मग्रुर हुकुमशाही सरकारचा , जाहीर निषेध.असे अमानवी कृत्य करणाऱ्या त्या नराधम तरुणांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत.
संबंध देशात आजही दलीत समाजावर अत्याचाराच्या घटना या होतच आहेत, आपल्या माय बहिणी सुरक्षित नाहीत, आजही आपला भाऊ ताट मानेनं जगत नाही, आजही आपला बाप पाटलाच्या , कुलकर्णी ,ठाकूर , अश्या सवर्ण समजल्या जाणाऱ्या
लोकांची चाकरी करण्यात धन्यता मानतो आहे. हे का? ....कारण
बहुजन समाज आजही एक झाला नाही. याला कारण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर एकही नेता असा जन्मला नाही की तो समाजाचं नेतृत्व करू शकेल. आणि दुसरी गोष्ट अशी की बहुजन समाज इतका कृतघ्न आहे की बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी समाजाचे नेतृत्व करावं अशी या समाजाची अजिबात अपेक्षा नाही. हा पण जे कोणी समाजाचे स्वयंघोषित नेते आहेत ,त्यांनी आपल्या सह पूर्ण समाजाला काँग्रेस ,राष्ट्रवादी ,भाजप ,
शिवसेना अश्या जातीयवादी पक्षाच्या दावणीला बांधून घेतले ले आहे. गल्लीत गल्लीत एक राष्ट्रीय नेता आहे....
काय चाललंय? काय आख्खी चळवळ या भामट्यांनी संपवली , वाट लावली चळवळीची, आणि हे का झालं तर एक पक्ष, एक नेता, आजतागायत बहुजनांना मिळाला नाही. याउलट बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले, छोट्या छोट्या तुकड्यात रिपब्लिकन. पक्ष विभागला ...मग कसा होणार समाज एक... वेगवेगळ्या जातीत विभाग लेला हा बहुजन समाज फक्त आरक्षणा पुर्ते बाबासाहेबांना मानतो आणि इतर वेळी हा या अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाचे धर्माचे गोडवे गात असतो, आणि एक वेळ अशी येते की,ही महानालायक लोकं ज्यांचे हे लोक गोडवे गातात तेच , अन्याय अत्याचार करतात यावेळी यांना जाग येते , आपण चुकीच्या लोकांना आपल मानल. हे सारं घडत कारण ,आपण एक नाही आहोत बहुजन समाजातील सगळ्या जाती,त्यांचे नेते, एक झाले पाहिजे ,मग काय बिशाद आहे, या नतद्रष्ट नराधम जातियवादी लोकांची , पण असं होताना दिसत नाही, होईल अशी अपेक्षा ठेवणेही उचित नाही.कारण आपल्या नेत्यांनी ठरवलंय की ,'मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या जातियवादी मानसिकता असलेल्या पक्ष्यांची गुलामीची करणार '.
असो तो त्यांचा प्रश्र्न पण नक्कीच एक दिवस असा येईल की, तमाम बहुजन समाज एका झेंड्याखाली येईल. निदान आपण अशी अपेक्षा तरी ठेऊ शकतो, आणि हे जेंव्हा होईल , तेंव्हा परत आपल्या कुण्या भाऊचा रोहित वेमुला होणार नाही, ना कुठे आपल्या भगिनी वर अत्याचार होईल , ना आणखी एक भोतमांगे न्यायाअभावी अनंतात विलीन होईल.
हे सगळं शक्य तेंव्हा होईल, जेंव्हा चळवळ योग्य दिशेने जाईल , एक संघटना,एक पक्ष , एक विचार या साऱ्यांचा मेळ बसेल तेंव्हा. शेवटी कवी वामनदादा कर्डकांचे ते बोल आठवते,
"भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते’'
सचिन झेंडे
पत्रकार दैनिक जनमत,
मो.9561682157
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा