वाळेखिंडी ता.जत येथे, वंचित बहुजन आघाडी महिला शाखेचे ओपनिंग
प्रतिनिधी जत
वाळेखिंडी ता.जत या गावी वंचित बहुजन आघाडी महिला शाखेचे ओपनिंग मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त बोलताना वंचित चे ता.अध्यक्ष अमोल साबळे म्हणाले कि, महिला वरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांना सक्षम बनविण्यााठी वंचित बहुजन आघाडी जत तालुक्यातील प्रत्येक गावी महिला आघाडीच्या शाखा काढण्यात येईल प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचा निर्धार केला असुन पुर्ण तालुक्यातील महिला या वंचित आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत सक्रीय होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अमोल भैय्या साबळे सह, भारिप महिला जिल्हा अध्यक्ष अपर्णाताई वाघमारे, भारिप जिल्हा उपाध्यक्ष बापू शेसवरे ,भारिप तालुका अध्यक्ष संजय बंडू कांबळे, वंचित महिला तालुका द.उपाध्यक्ष रेखाताई, वंचित तालुका द. उपाध्यक्ष भास्कर माने, वंचित शहर अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, वंचित संख गट अध्यक्ष विक्रम गिरगावकर, वंचित शाखा अध्यक्ष सुरेखा ताई ,व सर्व सन्माननीय पदाधिकारी व वाळेखिंडी ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा