गोंधळेवाडी (ता जत) येथील श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती ह.भ.प तुकाराम महाराज यांनी मठाचे भक्त लोक,कामगार व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप केले.

प्रतिनिधी संख/01 एप्रिल,2020
गोंधळेवाडी (ता जत) येथील श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती ह.भ.प तुकाराम महाराज यांनी मठाचे भक्त लोक,कामगार व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप केले. यामध्ये गव्हाचा आटा, पोहे, शेंगतेल ,साबण, जिरे ,साखर,चहा पावडर,मीठ,मोहरी,तूर डाळ, तांदूळ अश्या ११ जीवनावश्यक वस्तूंचे कीटमध्ये समावेश आहे
     कोरोना यापार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे घरातील लागणारे अन्नधान्य सुद्धा समाप्त झाले आहे माणुसकी दाखवत व्यक्ती व त्यांचे वाटप केले आहे यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन २ हजार एकशे एक जीवनावश्यक वस्तुंचे कीट बागडे बाबांचे भक्तगण व गरीब लोकांना ह.भ. प तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.
    तुकाराम महाराज याना सामाजिक कार्यात नेहमीच लोकांना मदत करतात.अनेक वेळा लोकांच्या मदतीला धाऊन जातात. दुष्काळ,महापूर यासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत पुराच्या वेळी कपडेलता,इतर साहित्याचे वाटप केले आहे. गेल्या वर्षी जत तालुक्यात भयानक अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी स्वतः स्वखर्चाने मोफत चारा छावणी सुरु केली होती. दुष्काळी पूर्व भागातील ६४ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी संख-गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय अशी पायी दिंडी काढली होती. गुड्डापुर येथे दुष्काळी परिषद घेतली होती. प्रत्येक गावाला पाण्याची टाकी होती.जतच्या यल्लामादेवीच्या यात्रेत पाण्याचा टँकर सुरु केले होते.  
     अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मानवमित्र संघटनेची स्थापन केली आहे.जळीतग्रस्त कुंटुबांना मदत केली आहे. कर्जबाजारीपणाने आत्महत्या केलेल्या कुंटुबांना आर्थिक मदत केली आहे. गणोत्सव मंडळानी गणेश मूर्तीचे  वाटप केले आहे.
   कोरोना च्या पार्श्वभूमीवर कालावधीत ग्रामीण भागातील सर्व हॉटेल, खानावळी बंद असल्याने चहापाणी, जेवणाचे हाल होत होते.पोलिसाची आस्थेने विचारपूस केली होती.त्यांच्या नाश्त्याची व जेवणाची माणुसकी दाखवत व्यवस्था केली आहे.तहसिल, प्रांताधिकारी कार्यालय,जत व उमदी पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले आहे.तालुक्यात ५ हजार मास्क हे वाटप केले आहेत.
यावेळी संजय धुमाळ,वास्तुशास्त्र सरीता लिंगायत, दत्ता सावळे, धानाप्पा राठोळ ,श्रीपाद लिंगायत,दामोदर धुमाळ, ज्ञानेश्वर खोत सिदराया मोरे सख उपस्थित होते.
" जत तालुका कायमस्वरुपी दुष्काळी आहे. ऊसतोडणी कामगार,वीटभट्टी कामगारांची संख्या जास्त आहे.राष्ट्रीय आपत्तीच्या दानशूर व्यक्तीनी मदतीचा हात द्यावा." असे आवाहन ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
मरीआई, कामगारांना वाटप :-
संख येथील मरीआई चे कुंटुबाचे शांताबाई कोळी ,बाहेरून आलेले सोमाण्णा व्हनमराठे, टेलिफोन कामगार यांना कीट वाटप केले.तसेच अंकलगी येथे १५ कुटंबांना कीट वाटप केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule