बनाळीतील कॅनॉल मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला लवकर मिळावा - संतोष जगतापप्रांताधिकारी यांची घेतली शेतकऱ्यांसह घेतली भेट



जत/प्रतिनिधी:
जत तालुक्यातील बनाळी गावामध्ये म्हैसाळ योजना कॅनॉल केलेला आहे.यामध्ये बनाळीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत अनेक वर्षे झाली तरी मोबदला मिळत नव्हता.अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून सर्वांचे प्रस्ताव पाठवलेला आहे. तरीही या शेतकऱ्यांना काही त्याचा मोबदला मिळाला नाही.यासाठी बनाळीतील कॅनॉल मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यानी जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याशी चर्चा करून भेट घेतली व म्हैसाळ योजनेचे अभिमन्यू मासाळ यांच्याशी चर्चा करून कॅनॉल मध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी मागणी केली.
आबासाहेब सावंत सर, बनाळी ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ जगताप, संजय सावंत, प्रकाश सावंत, शिवाजी यादव, सागर सावंत आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule