जत तालुक्यात होलार समाजातील कुठंबावरील हल्याची दुसरी घटना


प्रतिनिधी जत 
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांमध्ये होलार  समाजावर अन्यायाची दुसरी घटना धावडवाडी येथे झाली, पहिला  हल्ला  कोसारी  येथील  हेगडे कुटुंबावर होऊन  एक महिना पुर्ण होतो तोपर्यंत दुसरा हल्ला धावडवाडी येथील मुस्लिम समाजातील गावगुंडांनी केला असल्याची माहिती रावसाहेब हेगडे यांनी दिली.धावडवाडी येथील शितोळे कुटुंबातील *महिला* व त्यांच्या *मुलांना* जबरदस्त मारहान गुरुवार दिनांक  31/12/2020 रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली. श्री वसंत रामा केंगार यांची मुलगी सौ -लता विजय शितोळे न दोन मुलांन सह धावडवाडी येथील बस थांब्याशेजारी आपल्या राहत्या घरातून गावातील वडिलांच्या घरी निघाले असता अचानक त्याच्यांच  बाजुने आलेल्या कुत्र्याला हाड म्हणाले असता पाठीमागून येणारी मोटार सायकल आडवी मारुन (1)जनाब - आरिफ गफुर शेख वय  40(2) जनाब- मन्सुर उमर शेख वय (42)व त्यांचे साथीदार या सर्वांनी मिळून महिलेला *धक्का* *बुक्की* केली व त्यांच्या मुलांना *जबरदस्त* मारहाण केली .मुलगा *जीव* वाचवण्यासाठी धावत असता पाठलाग करुन मारहाण केली तसेच परत गावाशेजारुन बस स्टॉप पर्यत *धिंड* काढण्यात आली.तेथे काहींनी मध्यस्थी करून शितोळे आई व मुलांना सोडण्यात आले.                             दुसऱ्या दिवशी सकाळी श्री - *वसंत* रामा *केंगार* यांच्य घरी जाऊन *मन्सुर* उमर *शेख* व त्याचा *चुलत* भाऊ *शौकत* बादशाह *शेख* यांनी भांडण मिटविले होते , परंतु त्यांच दिवशी दुपारी परत चार पाच जण एकत्र येऊन  मारहाण करणार असल्याचे रेकॉर्डिंग *प्रथमेश* *विजय* *शितोळे* यांच्या मोबाईल वर मिळाले .हा   सर्व प्रकार पाहुण   सज्जन केंगार यांनी   अखिल भारतीय होलार समाज संघटना जत तालुका अध्यक्ष श्री -रावसाहेब राजाराम हेगडे यांच्या शी संपर्क साधला . यावेळी रावसाहेब राजाराम हेगडे त्वरीत शनिवार दिनांक 2/01/ 2021 सकाळी 10:00 संबंधित कुटुंबियांची भेट घेतली व समाज बांधवाशी चर्चा केली.अखिल भारतीय होलार समाज संघटना राष्ट्रीय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री रणजित ऐवळे पाटील साहेब ,सांगली जिल्हा अध्यक्ष श्री शंकरराव ऐवळे साहेब  जिल्हा सचिव मा. श्री गजानन गुळीग साहेब व सांगली शहर टिम या सर्वांच्या मार्गदर्शनाने जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 पहिल्या घटनेत मराठा समाजातील लोकांनी शेजारी असलेल्या रावसाहेब राजाराम हेगडे  रा.कोसारी ता.जत यांना व कुठंबियांना मारहाण केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule