तीन रुग्ण वाहिका तालुक्याला देण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांची घोषणा... जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या पहिल्याच मागणीला यश
जत/प्रतिनिधी:
जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे.उपचारासाठी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याची गरज असते.यासाठी तालुक्याला रुग्णवाहिकेची गरज असून त्या मंजूर करण्याची मागणी जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे जत येथील डॉ. रवींद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आरोग्य शिबिरात केली.या कार्यक्रमातच आमदार पडळकर यांनी तीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली.या घोषणेचे स्वागत उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात केले.
आमदार गोपीचंद पडळकर हे जतचे प्रसिद्ध डॉ.रवींद्र आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्यावतीने अध्यक्ष अमोल कुलकर्णी, शहराध्यक्ष गोपाल पाथरुट, सचिव शशिकांत हेगडे,शहर सचिव अनिल मदने यांनी तालुक्याला रुग्णवाहिकेची मागणी केली.लागलीच आमदार पडळकर यांनी तीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली. या घोषणेचे उपस्थित नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले.विशेष म्हणजे नुकतीच जत तालुका श्रमिक पत्रकार संघटनेची स्थापना झाली होती.एक सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णवाहिकेची मागणी केली.ही मागणी आ.पडळकर यांनी पूर्ण केल्याने जनतेतून श्रमिक पत्रकार संघटनेचे अभिनंदन केले जात आहे.
SHASHIKANT HEGADE
JATH
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा