विश्वरत्न Dr.B.R Ambedkar lecture

#बाबासाहेबांचे_शेवटचे_भाषण
 20 नोव्हेंबर1956 चे भाषण...

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या पहिल्याच 
'भारतातील जाती’ या शोधनिबंधात भारतातील वर्ग हे जातीच्या पोलादी भिंतींमध्ये बंदिस्त आहेत, म्हणजे वर्गच कैदेत बंदिस्त आहे, तर वर्ग लढाई कोण करणार याची जाणीव करून दिली होती. आज तरी त्या वास्तवात काही बदल झाला आहे का? मार्क्‍सला भारतातील जातिव्यवस्थेबद्दल काही देणे होते का? 

बाबासाहेब हे भारतातील दलित-अस्पृश्य वर्गाचे नेतृत्व करीत होते. काय होती त्यावेळच्या भारतातील अस्पृश्यांची अवस्था? अस्पृश्य गरीब नव्हते का ?
ते भूमिहीन, शेतमजूर नव्हते का ?
त्यांचे शोषण-पिळवणूक होत नव्हती का?
मग त्यांच्या मुक्तीसाठी आंबेडकरांनी मार्क्‍सवादी क्रांतीचा मार्ग का स्वीकारला नाही? त्याऐवजी ते  लोकशाहीच्या विचारांकडे का वळले? रशियन कम्युनिस्ट राज्यक्रांतीने सारे जग भारावले असताना आणि जगात मार्क्‍सवादाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना डॉ. आंबेडकरांनी मार्क्‍सला बुद्धाचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. 

मार्क्‍स म्हणतो, "जगात पिळवणूक आहे"
बुद्ध म्हणतो, "जगात दु:ख आहे."
बाबासाहेबांचे त्यांच्या आयुष्यातील 20 नोव्हेंबर 1956 चे
'बुद्ध की कार्ल मार्क्‍स' हे अखेरचे भाषण आहे. 
बुद्धाने दु:ख हा शब्द दारिद्रय़, गरिबी या अर्थाने उपयोगात आणल्याचे बाबासाहेबांनी म्हटले आहे. म्हणजे शोषण किंवा दु:ख हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. 
मोह, हव्यास, लालसा, लोभ या प्रवृत्तींतून नफेखोरी आणि नफेखोरीतून भांडवलदारी आणि भांडवलदारीतून सर्वसामान्यांचे शोषण-पिळवणूक हे दुष्टचक्र सुरू होते. मार्क्‍सवादाच्या पिळवणुकीचे किंवा शोषणाचे मूळ मोहात किंवा लोभात आहे आणि बुद्धाच्या दु:खाचे मूळ तृष्णेत आहे. तृष्णा म्हणजेच हव्यास, लालसा, मोह, लोभ वगैरे. इथपर्यंत बुद्ध आणि मार्क्‍स समान किंवा समांतर वाटेवरून प्रवास करतात...
 
मात्र
'शोषणमुक्तीचा किंवा दु:खमुक्तीचा मार्ग कोणता?' या प्रश्नावर त्यांच्या वाटा वेगवेगळ्या होतात. शोषणमुक्त समाजासाठी मार्क्‍सला रक्तरंजित क्रांती हवी आहे, तर बुद्धाला समाजमन बदलून परिवर्तन घडवायचे होते. माणसांसाठी माणसे मारणे ही कसली क्रांती? म्हणूनच हिंसेचा मार्ग अव्हेरून बाबासाहेब सामाजिक क्रांतीसाठी बुद्धाचा आणि लोकशाहीचा मार्ग स्वीकारतात. 
लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तविहिन असा क्रांतिकारी बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही, ही त्यांची व्याख्या मार्क्‍सवादाच्या रक्तरंजित क्रांतीच्या नेमकी विरोधी आहे. 
आज कॉमुनिस्ट चळवळींमध्ये प्रकर्षाने आंबेडकरांचं नाव घेतलं जातं मात्र त्यांच्याच लोकशाहीवादी, अहिंसक मार्गाने परिवर्तन घडवून आणण्याच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात मार्क्‍सवादी क्रांतीचे विचार मांडले जातात. 
ही फुले-आंबेडकर विचारांशी प्रतारणा नव्हे काय?

मुळात जातीबद्ध बहुजनवाद हा आंबेडकरी विचारांच्या विरोधी आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. पण अलीकडे कित्येकदा आंबेडकरी चळवळीवर हिंसेचा ठपका लावला गेलाय तो कशामुळे? कुणामुळे? याचा विचार आपण नक्की केला पाहिजे.

हजारो वर्षापासून भारतातील शोषणव्यवस्था ही जातीवर आधारित असताना जातीअंताचा मुद्दा प्रखरतेने कॉमुनिस्ट अजेंड्यावर कधी आला आहे का ? 
भारतातील कोणतीही समस्या घ्या , 
त्या समस्येच्या मुळाशी इथली जातव्यवस्था आहे. 
त्यामुळे जो पक्ष, जी संघटना, जी विचारधारा,
आपल्या मुख्य अजेंड्यावर #जात्यांत वा #जातनिर्मूलन हे विषय घेऊन लढत नाही. ती इथे प्रभावहीनच ठरते.
आजघडीला मार्क्सवाद, समाजवाद असे कितीतरी 'वादी' 
नेहमी पुरोगामीत्वाचा रेटा ओढत असतात. पण यांच्या मुख्य अजेंड्यावर जात निर्मूलन हा विषय नेहमीच दुय्यम राहिला आहे.
त्यामुळे जातीअंतासाठी बाबासाहेबांनी दिलेलं
'Annihilation Of Caste' आणि '#धम्मक्रांती' हेच अत्यंत प्रभावी ठरत..
अन्यथा बेगडी पुरोगामीत्व तर काय कामाच ?

आज स्वतःला 'आंबेडकरवादी' 'बुद्धवादी' म्हणवून घेणारे लोक सुध्दा जेंव्हा मार्क्सवादाच्या वळचळनीला जाऊन बसतात. तेंव्हा खूप वाईट वाटत. 
मार्क्स, त्याच तत्वज्ञान, त्याची जगभरातील ख्याती, त्याचे अनुयायी याबद्दल प्रश्नच नाही.
पण अलीकडे मार्क्सवादाला थेट बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या सोबत बसवण्याची अतिशयोक्ती कुठंतरी थांबली पाहिजे.
माझ्या या मताशी अनेक तथाकथित विचारवंत असहमतही असतील. आणि प्रत्येकाने माझ्या मताशी सहमत असावाच असही नाहीय. प्रत्येकाला विवेक, विचार, अभिव्यक्त स्वातंत्र्य आहेच. आणि तसा मी खूपच छोटा माणूस आहे. पण बाबासाहेबांनी ताटात जेवढं वाढून दिलंय. आणि जेवढी मला समज आहे. 
त्यावरून
कार्ल मार्क्स पेक्षा #बुद्धच मला अधिक 
जवळचा प्रिय सखा वाटतो
एवढं नक्की...

●●● विजय सैदाने 9579768181

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule