माडग्याळ ता. जत येथे 40 ऑक्सिजनयुक्त बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन
माडग्याळ ता. जत येथे 40 ऑक्सिजनयुक्त बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांचे हस्ते करण्यात आले. जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटी , संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हैत्रे, उपसभापती विष्णु चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील , माडग्याळचे सरपंच इरान्ना जत्ती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर , अधीक्षक सतीश गडदे , मेडिकल ऑफीसर डॉ. प्रियांका पाटील, प्रदीप करगणीकर उपस्थित होते .यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, , सद्यस्थितीत देशभरात कोरोनाने थैमान घातले असून ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढती संख्या पाहून जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अत्यंत चांगले नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात कोरोना संक्रमण घटेल. तरी सर्व तालुक्यातील नागरिकांनी घरी राहून आपली व आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घ्यावी,असे आवाहन केले.येथे ऑक्सिजन बेड कोविड सेंटर झालेने या भागातील कोविड रुग्णांना यांचा फायदा होणार आहे . जत पूर्व भागातील रुग्णांना सोय व्हावी म्हणून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले आहे . त्यामुळे या भागातील नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा