जत शहरात शिवसेनेचा उपक्रम...पाच रुपयांत शिवभोजन थाळी सुरु... तसेच गरीबांना मास्क वाटप
कामगार शिवसेना व लायन्स क्लब जत कडून मास्क वाटप
जत :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गोरगरिबांना कामगार सेना व लायन्स क्लब जत यांच्या कडून दुधाळ वस्ती, नदाफ गल्ली, घाटगेवाडी रस्ता येथील लोकांना व आशा वर्क सना मास्क आणि जीवनाश्वक वस्तू रवा पाकिटचे वाटप करण्यात आले .कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे व लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तृत्वनिशी हे वाटप केले.
जत मध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ
जत : महाविकास आघाडीचा शिवभोजन थाळीचा शुभारंभ जत येथील बसस्थानक मधील उपहारग्रहात झाला. या शिवभोजन थाळीचा सर्व जतवासिय गोरगरिबांनी फक्त 5रु मध्ये आस्वाद घ्यावा .या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जत तालुका एस टी कामगार सेना अध्यक्ष यशवंत शिंदे, जत एस टी कॅन्टीन मालक सुरेश अंगडी व काही ग्राहक उपस्थित होते.
PleaSe feel free for any suggestions....
Comment to us by following us PSKNEWS1.Blogspot, TVNEWS MARATHI
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा