सर्व विश्व बौद्धमय करण्याचे सम्राट अशोकाचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प करूया - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 2 - भगवान गौतम बुद्धांच्या शांती; अहिंसा विचारांचा जगभर प्रसार करणारे धम्म सम्राट अशोक यांचे सर्व विश्व बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प करूया हेच सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरे अभिवादन ठरेल आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. सम्राट अशोक यांच्या 2324 व्या जयंती निमित्त जनतेला शुभेच्छा देणाऱ्या संदेशात ना रामदास आठवले यांनी सम्राट अशोकाचे विश्व बौद्धमय करण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
भगवान गौतम बुद्ध ; सम्राट अशोक; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणामुळे आपण कोरोनाच्या संकटाचा जागृत बुद्धीने मुकाबला करू शकतो. असे ना रामदास आठवले म्हणाले.
चातुर्वर्ण्य वैदिक धर्माला वैचारिक धक्का देण्याचे काम बौद्ध धम्माने केले. बौद्ध धम्माचे वैज्ञानिक विचार जगात पोहोचविण्याचे काम सम्राट अशोकाने केले. जगभर बौद्ध धम्माचा प्रसार त्यांनी केला. कलिंग च्या युद्धात अतिहिंसाचार झाला. तेथे रक्त मांसाचा चिखल झाला. ते पाहुन पश्चाताप झालेले अस्वस्थ झालेल्या सम्राट अशोकांना भगवान गौतम बुद्धांचे शांती अहिंसेचे विचार पटल्याने त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्यांनी केलेले धम्मचक्र प्रवर्तन बौद्ध जगतात अत्यंत महत्वपूर्ण ठरले. त्यांनंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धम्म चक्र प्रवर्तन महत्वपूर्ण ऐतिहासिक ठरले आहे. सम्राट अशोक यांची जयंती धम्म प्रसाराची प्रेरणा देणारी आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धिप्रमुख
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा