माडग्याळ परिसरातील एटीएम मशीन नसून अडचण असुन खोळंबा

                                                                               
PSKNEWS1.BLOGSPOT , PSK NEWS CHANNEL
प्रतिनिधी माडग्याळ/02एप्रिल,2020
माडग्याळ परिसरातील एटीएम मशीन नसून अडचण असुन खोळंबा.अशी अवस्था निर्माण झाली आहे , जत तालुक्यातील माडग्याळ येथे, तसेच गुड्डापुर येथे बँक ऑफ इंडिया चे एटीएम असुन ते गेली आठवडा भर बंद असल्याचे चित्र दिसते आहे , यामुळे परिसरातील जनतेची खुप मोठी आर्थिक गैरसोय होत आहे.
एकीकडे कोरोणा वायरस ने अख्या जगभर थैमान घातले असुन भारतात सुद्धा हा वायरस झपाट्याने पसरत असल्याचे दिसते आहे, यावर भारत सरकारने लगोलग पावले उचलत 22 मार्च पासून पुर्ण भारत लाँकडाऊन केला. अशी परिस्थिती असताना,ही परिस्थिती कधी बदलेल याची ही काही आयडिया नाही, पुर्ण भारतातील लोक नजरकैदेत आहेत, कुणालाही रस्त्यावर यायची परवानगी नाही, ना घरातुन बाहेर पडायची , ना कुणा सोबत बोलायची .......असो , भारत सरकारने घेतलेला हा निर्णय आपल्या हितासाठी च आहे आणि याचे आपण काटेकोर पालन केले तर नक्कीच या कोरोणा युद्धात आपण कोरोणा विषाणू वर मात करु..... पण तरीही यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जानवते आहे , की भारतीय खेड्या पाड्यात रहणारी जनतेच्या आर्थिक बाजू ..... एक तर गावातील प्रत्येक घरातील चुल हि रोजंदारी वर कामाला गेले तरच चालते....या संपूर्ण लाँकडाऊन मुळे रोजगार बंद, छोटे मोठे व्यवसाय बंद,त्यामुळे कमाई बंद , मग पोटाची भरणार कसे हा खुप मोठा प्रश्न पडलेला,जी काही जमापुंजी तीही जवळील बँंक खात्यात, समजा त्यातही काही सरकारी नोकर असतील काही खजगी कंपनीत काम करत असेल नक्कीच त्याच्या कडे या महिना अखेर ला पैसे त्यांच्या अकाऊंटला आहे पण बँका मधुन हे पैसे मिळत नाहीत... बँकेतून आवाज येतो कँश देणे बंद आहे तुम्ही एटीएम ला का जात नाही, मग ति मिडल क्लास सधन व्यक्ती एटीएम जवळ जाते जवळपास अर्धा तासाने त्याचा नंबर येतो ,मशीन मध्ये कार्ड घालुन आवश्यक माहिती टाकतो न टाकतो तोच एटीएम मध्ये पैसे नसल्याचा एक मेसेज त्या एटीएम स्क्रीन च्या वर दिसतो अगदी सेम प्रोसेस त्या व्यक्ती च्या अगोदर नंबर असलेल्या नी अनुभव लेला असतो....एकुण परिस्थिती अशी आहे की, 'घरातच आहे मोरी आणि मु.....चोरी', थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की ग्रामिण भागात डिजिटल व्यवहार शक्य नाही परिणामी येथील लोकांवर उपासमारीची वेळ येईल, तेंव्हा प्रशासनाने परिस्थिती चे गांभीर्य समजून घेऊन ग्रामीण भागातील सर्व एटीएम मधुन पैसै उपलब्ध करावे....

सचिन झेंडे
दै.जनमत सर्वसामान्यांचे,
संपर्क.9561682157

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule