सलाम मुंबई फौंडेशन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग , सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या तंबाखू मुक्त शाळा अभियाना 2020-21 ......येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी च्या स्कूल ऑफ प्रोग्रेसिव एज्युकेशन (स्कोप) जालिहाळ बु., ता. जत, जिल्हा. सांगली या विद्यालयाच्या सुदीप मुचंडी, वीणा कुंडले, विठाबाई बिराजदार, पुंडलिक कुंडले, प्रमोद तांबे या विद्यार्थ्यांची व तज्ञ शिक्षक म्हणून सुजाता कांबळे मॅडम यांची निवड



प्रतिनिधी जत/२४/१२/२०

सलाम मुंबई फौंडेशन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग , सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या तंबाखू मुक्त शाळा अभियानामध्ये 2020-21 च्या बाल परिषदेसाठी येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी च्या स्कूल ऑफ प्रोग्रेसिव एज्युकेशन (स्कोप)  जालिहाळ  बु., ता. जत, जिल्हा. सांगली  या विद्यालयाच्या  सुदीप मुचंडी, वीणा कुंडले, विठाबाई बिराजदार, पुंडलिक कुंडले, प्रमोद तांबे या विद्यार्थ्यांची व तज्ञ शिक्षक म्हणून सुजाता कांबळे मॅडम यांची निवड झाली आहे. यासाठी सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे येरळा  संस्थेचे संस्थापक श्री. नारायण देशपांडे यांनी अभिनंदन केले. 
तंबाखू मुक्त शाळा अभियान जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी जालिहाळ गावामध्ये व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्य सादर करुन व्यसनमुक्ती व धुम्रपानाचे, तंबाखू चे तोटे नाट्यमय रूपानें त्याचे सादरीकरण करून व्यसनाचे धोके समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाद्वारे तरुणांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी, गावाचा विकास, आदर्श देश, आणि कुटुंबाप्रती जबाबदारी यासाठी व्यसन मुक्ती अशा गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न केला.... 
या कार्यक्रमासाठी स्कोप च्या  पवार सर, मुंडे सर, मुख्याध्यापक श्री. सावंत सर,  तसेच सलाम मुंबई फौंडेशन चे प्रकल्प समन्वयक श्री. संजय ठाणगे,सलाम मुंबई फौंडेशन व सहायक सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी रविंद्र कांबळे, गंगाधर कांबळे, सांगली व कोल्हापूर जिल्हा समन्वयक सौ. ज्योती राजमाने  मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच येरळा  प्रोजेक्ट्स सोसायटी च्या प्रकल्प समन्वयक अपर्णा कुंटे मॅडम यांची प्रेरणा मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule