जतमध्ये पोलिसांचा रूटमार्च ;जत पोलीस स्टेशन मार्फत 31 डिसेंबर व नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांना सर्वसाधारण सूचना

जत/प्रतिनिधी: 
आज ३१ डिसेंबर निमित्ताने जत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सूचना करण्यात येते की, ३१ डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना नागरिकांनी कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी केले आहे .

सध्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभुमिवर मा. जिल्हाधिकारी सो. यांचे कडून जमावबंदी आदेश लागू आहेत. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता यंदाचा ३१ डिसेंबर कुटुंबासोबत साधेपणाने साजरा करावा.
● साऊंड/स्पीकर/DJ सिस्टम लावू नये. असे केल्यास मा. न्यायालया मार्फत दंडात्मक कारवाई होऊ शकते.
फटाके वाजवू नयेत. मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व मा जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग होऊन कलम 188 प्रमाणे कारवाई होऊ शकते. 
● दारू पिवून बेदरकार वाहने चालवू नयेत. यामुळे आपले व इतरांचे जीवित धोक्यात येते. आपणावर मो. वा. का. क. 185 प्रमाणे कारवाई होऊन आपला परवाना निलंबित होऊ शकतो.
●सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करू नये. यामुळे आपणावर महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई होऊ शकते.
● हॉटेल व परमिट रूम चालकानी आपल्या आस्थापना वेळेत बंद कराव्यात. न केल्यास आपणावर महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई होऊ शकते.
वरील प्रमाणे कारवाई झाल्यास आपला पासपोर्ट, चरित्र पडताळणी व इतर सरकारी कामांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांवर परिणाम होऊन नोकरी व व्यवसाय सुरू करण्यास अडचणी येवू शकतात..

*कारवाई पेक्षा, सावधगिरी बाळगा... सुरक्षित रहा....!*

🙏🏻 जत पोलीस स्टेशन अधिकारी व स्टाफ सदैव आपल्या रक्षणासाठी तत्पर आहे... पोलीस प्रशासनास सहकार्य करा...! 🙏🏻
आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule