पालकमंत्री जयंत पाटील जत साखर कारखाना मोठ्या मनाने सभासदांचा करतील-अजित पाटील


जत/प्रतिनिधी:-
     जत तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा साखर कारखाना असावा म्ह्णून राजे विजयसिंह डफळे यांनी जत मध्ये साखर करण्याची निर्मिती केली. तोच साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात देऊन पालकमंत्री जयंत पाटील सभासदांना नक्कीच न्याय देतील असा विश्वास रासपचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी व्यक्त केला.
     राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवार कार्यरत असताना राजे विजयसिंह डफळे यांच्या प्रेयत्नातून जतच्या साखर कारखाना उभारणीला परवाना मिळाला आणि शरद पवार यांच्या हस्ते जत साखर कारखाण्याचे भूमिपूजन संपन्न झाले. राज्यामध्ये सर्वात कमी खर्चात तयार झालेला अडीच हजार म्याट्रिक टन गाळपाचा साखर कारखाना असा इतिहास लाभलेला जतचा साखर कारखाना पुन्हा एकदा सभासदांचा व्हावा ही तालुक्यातील जनतेची माफक अपेक्षा आहे. तसेच राज्यामध्ये योगायोगाने महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे राज्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्याची जबाबदारी सांगलीचे पालकमंत्री तसेच राज्याचे जबाबदार मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आहे. शेतकऱ्यांचे कैवारी व देशभर जाणता राजा म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी भूमिपूजन केलेल्या साखर कारखाना हा सभासदांचा झाल्यास नक्कीच शरद पवारांना देखील अत्यानंद होईल. तसेच तालुकातील असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आणि सभासदांना न्याय मिळेल.
    जत साखर कारखान्याच्या मालकीची २०८ एकर क्षेत्र असणाऱ्या जमीनीमधील वरील ५८ एकर जमीन विक्री केली तरी कारखाना कर्जातून मुक्त होऊ शकला असता असे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा तर्क होता. आणि कारखाना सभासदांचाच राहावा ही भूमिका होती. पण त्या परिस्थिती मध्ये तस घडलं नाही. परंतु अजूनही पालकमंत्री जयंत पाटलांनी ठरवलं तर जत साखर कारखाना संभासदांचा होऊ शकतो. आणि तो ते नक्कीच मोठया मनाने करतील असा आत्मविश्वास मला वाटतो कारण लोकनेते राजारामबापू पाटील यांचे ते पुत्र आहेत आणि बापूंचे जत तालुक्यावरील विशेष प्रेम आणि तालुक्यामधील पाणी प्रशांची तळमळ व आपुलकी जोपासत साखर कारखाना सभासदांचा करीत जयंत पाटील खऱ्या अर्थाने लोकनेते राजारामबापू पाटील यांना आदरांजली अर्पण करतील आणि आमचे खरे पालकत्व बनतील त्या दिवशी जत तालुक्यातील शेतकरी व सभासद जयंत पाटलांना डोक्यावर घेतीलच पण राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रासपचे संस्थापक अध्यक्ष आ.महादेव जानकर यांच्या हस्ते जत मधील चौकात जाहीर सत्कार कार्यक्रम आम्ही घेऊ आणि नक्कीच ही संधी आम्हाला पालकमंत्री जयंत पाटील देतील असा विश्वास अजित पाटील यांनी व्यक्त केला.

उपसंपादक
शशिकांत हेगडे (जत)
मो.9011019031

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule