आवंढी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट
जत/प्रतिनिधी:
आवंढी येथील रखडलेल्या म्हैशाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांची आवंढी गावचे सरपंच तथा सरपंच परिषेदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांच्यासोबत आवंढी येथील शेतकऱ्यांच्या शिस्टमंडळाने भेट घेतली
सरपंच कोडग म्हणाले की,अंतराळ येथून म्हैशाळ च्या मुख्य कालव्यापासून येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनचे काम फेब्रुवारी 2019 ला सुरू झाले. परंतु सदर कामाचा वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा अद्यापही काम पूर्ण झाले नाही.सदर पाईपलाईन चे काम तात्काळ पूर्ण करण्याचे व आवंढी येथील उर्वरित राहिलेला शेतीचा भाग सिंचनाखाली आणण्यासाठी माणिकनगर ते सोळगेवाडी 2 किमी व दत्तनगर ते शिवारवस्ती 2 किमी अशी वाढीव पाईपलाईन करण्याची व येणाऱ्या आवर्तनात पाणी सोडून दुष्काळी गावातील जनतेला दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.येणाऱ्या आवर्तनात या म्हैशाळ योजनेचे पाणी सुरू केल्यास जत तालुक्यातील अंतराळ,शिंदेवाडी, मोकाशेवाडी,बागलवाडी, शिंगणहळी,आवंढी व लोहगाव या गावातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे . सदरचे निवेदन स्वीकारल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हैशाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम त्वरित पूर्ण करून येणाऱ्या आवर्तनात शेतीसाठी पाणी देण्याचे शिस्टमंडळाला आश्वासन दिले
याप्रसंगी ड्रॅगन फ्रुटचे प्रगतशील बागायतदार संभाजी कोडग,उपसरपंच आण्णासाहेब बाबर,डॉ आण्णासो कोडग,उद्योगपती दिनेशभाऊ सोळगे,विट्ठल कोडग सर,बापू तोरणे,सुभाष कोडग,विनोद कोडग,आण्णासाहेब बाबर,नारायण कुंभार,भारत सोळगे, अंकुश कोडग,योगेश कोडग,अक्षय कोडग आदी शेतकरी उपस्थित होते.
उपसंपादक
शशिकांत हेगडे(जत)
मो.9011019031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा