जत आगार कामगार सेना अध्यक्षपदी बळीराम यादव, सचिवपदी पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड
जत/प्रतिनिधी:
जत आगार कामगार सेनेची अध्यक्ष /सचिव यांची निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या निवडी करण्यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश हंकारे व एस.टी.कामगार सेनेचे जिल्हा सचिव प्रवेश हंकारे,जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, एस.टी.कामगार सेना जत अध्यक्ष पी.टी.मदने ,सचिव पोपट शिंदे , उपाध्यक्ष बळीराम यादव ,दिलीप कोरे,रमेश मिसाळ,मच्छिंद्र बंडगर ,सी वाय पाटील ,विक्रम सुतार व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते .
या निवडी प्रकाश हंकारे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव प्रवेश हंकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.अध्यक्ष म्हणून बळीराम यादव व सचिव म्हणून पोपट शिंदे यांची निवड जत आगार एस.टी.कामगार सेना कार्यकारिणीमध्ये करण्यात आली.सर्व कामगार सभासदांनी या निवडीचे स्वागत केले व एस.टी.कामगार सेनेचा जयघोष केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा