रस्त्याकडेची काटेरी झाडे झुडपे जतकरांसाठी बनलेत मृत्यूचे सापळे... काटेरी झाडे, झुडपे काढण्याचीश्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेची मागणी



जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील अनेक गावांत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढले आहेत. या काटेरी झाडा, झुडपामुळे रस्ता तर अरुंद झालाच आहे त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ही बाब गंभीर असताना ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याकडेची झाडे झुडपे वाढली आहेत ती काढण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी चिकलगी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेनी केली आहे.
चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य प्रशांत कांबळे यांनी यांनी यांबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांना दिले आहे. 
श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात तुकाराम बाबा महाराज, प्रशांत कांबळे यांनी नमूद केले आहे की, विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात १२० गावे, वाड्या, वस्त्या आहेत. तालुक्यात बहुतांश सर्व गावांना जायला रस्ते आहेत. गावातून जाणारे रस्ते, वळणावरील रस्ते हे सध्या जतकरांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे, झुडपे वाढली आहेत. या वाढलेल्या काटेरी झाडा- झुडपामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. एखादे मोठे वाहन समोरून आले तर दुसरे वाहन तेथून जाऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर या अरुंद झालेल्या काटेरी रस्त्यामुळे छोटे छोटे अपघात झाले आहेत. अपघातात वाढ झाली आहे.
ग्रामपंचायतीला देण्यात येत असलेल्या फंडातून सदर रस्त्यावरील काटेरी झाडे, झुडपे काढून टाकली तर अपघाताचे प्रमाण तर कमी होईलच शिवाय रस्ते ही मोकळा श्वास घेतील. तेव्हा हे झुडपे तात्काळ काढावेत अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.
रस्त्याकडेचे काटेरी झाडे, झुडपे काढा या मागणीचे निवेदन देताना तुकाराम बाबा महाराज, प्रशांत कांबळे.

उपसंपादक
शशिकांत हेगडे (जत)
मो.9011019031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule