होलार समाजाला संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी विट्याचे आमदार अनिल बाबर

विटा (वार्ताहर)- होलार समाजाला संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी विट्याचे आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्हयात होलार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते नेहमी शिवसेना पक्षाबरोबर काम करीत आहेत. हा समाज नेहमी सत्तेपासून वंचित राहिला आहे. हौलार समाजास आर्थिक दृश्ट्या सक्षम बनवायचे असेल तर या समाजासाठी कोणत्याही राज्याच्या महामंडळामधून कर्ज दिले जात नाही. चप्पल तयार करण्यासाठी कातड्याचा व्यापार हा चर्मकार समाजाबरोबर होलार, मांग व ढोर समाजाचेहि योगदान आहे. त्यामुळे चर्मकार समाज बरोबर होलार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी होलार समाजाला आर्थिक विकास महामंडळात संचालक अथवा अध्यक्ष पदांवर समावेश केला जात नाही. यासाठी संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये सामावून घ्यावे. अन्यथा या होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. याबाबत अखिल भारतीय होलार समाज संघटना (A गट), महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी माझ्या मार्फत वारंवार पाठपुरावा व मागणी करत आहेत  तरी होलार समाजाच्या मागणीचा विचार करून त्यांना संत रोहिदास आर्थिक विकास
महामंडळामध्ये सामावून घेण्यात यावे, अशी मागणी.पत्र लिहून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिवसेनेचे विटा खानापुर मतदार संघातील आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule